प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. अनंत राधिका यांच्या संगीत आणि हळदीचा कार्यक्रम नुकतेच मोठ्या थाटामाटात पार पडला. हळदीला नवरीचं रुप सुंदर दिसतं, खुलून येतंच. राधिकाही अप्रतिम देखणी दिसत होती आणि खास होता तो तिचा ड्रेस. फुलराणी झालेल्या राधिकाच्या हळदी ड्रेसची म्हणूनच चर्चा आहे. फोटो पाहा, असा दुपट्टा किती सुरेख दिसतो. तर त्या दुपट्ट्याची ही खासियतही पाहा(Radhika Merchant’s Floral Jaal Dupatta Featured Over 1000 Tagar Kalis, 90 Genda Flowers).
१२ जुलैला अनंत राधिका हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. ८ जुलैला अनंत राधिका यांचा हळदी समारंभ पार पडला. नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घर अँटिलिया येथे या जोडप्याचा हळदी समारंभ होता. हळदीच्या दिवशी राधिका सुंदर सजली होती. तिने पिवळ्याधम्म रंगाचा ड्रेस घातला होता. पिवळ्या रंगाच्या ड्रेस दुपट्टा मात्र कापडाचा नव्हता तर फुलांचा होता(Details of Radhika Merchant's Haldi outfit made of 1000 fresh Mogra and 90 Genda flowers revealed).
हळदी सोहळ्यासाठी राधिकाने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. त्यावर तिने ताज्या फुलांचा दुपट्टा घेतला आहे. मोगऱ्याच्या फुलांनी तयार करण्यात आलेल्या फ्लॉवर दुपट्टा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोगऱ्याच्या दुपट्याच्या किनारी भागात पिवळ्या झेंडूची फुले लावण्यात आली आहेत. राधिका मर्चंटचा हा लूक सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने केला होता. तर राधिकाचा लेहंगा फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता.
अंबानींकडच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या जांभळ्या साडीचीच चर्चा, ती साडी इतकी खास आहे कारण...
राधिकाच्या या दुपट्ट्यात एकूण ९० हून अधिक झेंडूच्या तर शेकडो मोगऱ्याच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. हा दुपट्टा फ्लोरल आर्ट डिझाईन स्टुडियो यांनी डिझाइन केला आहे. हा दुपट्टा तयार करायला एक रात्र लागली असल्याचे समजते. हळदी सोहळ्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या दुपट्ट्यासोबतच फुलांचे दागिने देखील तयार करण्यात आले आहेत. राधिकाने तिच्या हळदी लूकमध्ये फुलांच्या कळ्यांपासून तयार करण्यात आलेला चोकर आणि लांब हार घातला त्यावर मॅचिंग कानातले देखील घातले आहेत. तसेच दोन्ही हातांमध्ये फुलांच्या बांगड्या घातल्या आहेत.
या लूकवर राधिकाने साजेसा असा लाईट मेकअप करणे पसंत केले आहे. मेकअप अगदी लाइट ब्लश, साधी छोटी लाल बिंदी, आयलायनर आणि न्यूड शेडची लिपस्टिक असा करण्यात आला होता. फुलराणी नवरी अर्थातच खूप सुंदर दिसते आहे.
यानंतर फुलांच्या दुपट्ट्याचा असा ट्रेण्ड सुरु झाला तर नवल नाही.