'रईस' चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) काम करायला मिळालं आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Raees Fame Actress Mahira Khan) रातोरात हीट झाली. तो चित्रपट पाकिस्तानात पण प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी दोन्ही देशांमधली परिस्थिती तंग झाली आणि चित्रपट तिकडे प्रदर्शित होऊ शकला नाही. या गोष्टीचा सतत डोक्यात येणारा विचार आणि त्याचवेळी रणबीर कपूरसोबत (Ranbeer Kapoor) असताना तिचे व्हायरल झालेले काही फोटो आणि त्यामुळे होणारं ट्रोलिंग याचा एकत्रित परिणाम होऊन माहिराला खूप जास्त डिप्रेशन आलं होतं. manic depression चा त्रास तिला होऊ लागला आणि अजूनही ती काही प्रमाणात त्याच अवस्थेतून जात आहे, असं तिने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.
ही गोष्ट आहे २०१७ ची. त्यावर्षी रणबीरकपूर सोबत धुम्रपान करतानाचे तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर झाले होते. फोटोवर आलेल्या विचित्र कमेंट आणि त्यामुळे झालेलं जबरदस्त ट्रोलिंग माहिराच्या मानसिक अवस्थेवर परिणाम करणारं ठरलं. ती म्हणाली की तिला त्याच्या आधीपासूनच मानसिक त्रास होता.
खाणार का बार्बी डोसा? आता हा कोणता नवा प्रकार, गुलाबी डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ
वारंवार डिप्रेशन यायचं. पण त्या काही घटना घडल्या आणि त्यानंतर मात्र तिला भयंकर मानसिक त्रास झाला. तो काळ तिच्यासाठी खूप जास्त कठीण होता, असंही तिने सांगितलं. manic depression हा प्रकार साधारणपणे बायपोलार डिसऑर्डरसारखा असतो. यामध्ये त्या व्यक्तीची मानसिक अवस्था कोणत्या क्षणी किती बिकट होईल, हे सांगताच येत नाही. मानसिक अस्वास्थ्याचं हे प्रमाण एवढं जास्त असतं की त्या व्यक्तीला तिची दैनंदिन कामं करणंही होत नाही.
या त्रासाबद्दल सांगताना माहिरा म्हणते की एकदा तर मला खूप जास्त घबराट झाली आणि मी चक्कर येऊन पडले. त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचारही घेतले पण विशेष फरक पडला नाही.
खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? चक्रासन करा, मलायका अरोरा सांगतेय चक्रासन करण्याचे ५ फायदे
त्याकाळात माझे हात- पाय थरथर कापायचे, रात्री झोप यायची नाही. ते वर्ष तिच्यासाठी खूपच कठीण होते असंही तिने नमूद केले. आजही माहिरा तिच्या मानसिक त्रासासाठी औषधोपचार घेत आहे.