Lokmat Sakhi >Social Viral > कौतुकास्पद! विदाऊट तिकिट प्रवाशांकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड गोळा करणारी पहिली महिला टिसी

कौतुकास्पद! विदाऊट तिकिट प्रवाशांकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड गोळा करणारी पहिली महिला टिसी

1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine : रेल्वेच्या परिवहन मंत्रालयाने महिला तिकीट तपासनीसाचे कौतुक करणारे ट्विट केले. (Railway ministry lauds 1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 03:00 PM2023-03-25T15:00:57+5:302023-03-25T15:15:21+5:30

1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine : रेल्वेच्या परिवहन मंत्रालयाने महिला तिकीट तपासनीसाचे कौतुक करणारे ट्विट केले. (Railway ministry lauds 1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine)

Railway ministry lauds 1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine | कौतुकास्पद! विदाऊट तिकिट प्रवाशांकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड गोळा करणारी पहिली महिला टिसी

कौतुकास्पद! विदाऊट तिकिट प्रवाशांकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड गोळा करणारी पहिली महिला टिसी

भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्या महिला तिकीट निरीक्षकाचे कौतुक केले. ज्यांनी यशस्वीरित्या प्रवाशांकडून एक कोटींहून अधिक दंड केला. दक्षिण रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक रोजालिन अरोकिया मेरी यांनी तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून १.०३ कोटी दंड वसूल केला आहे. (1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine) तिकीट नसतानाही प्रवास करणारे आणि तिकीट असतानाही चुकीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून हा दंड वसून करण्यात आला आहे.  रेल्वेच्या परिवहन मंत्रालयाने महिला तिकीट तपासनीसाचे कौतुक करणारे ट्विट केले. (Railway ministry lauds 1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine)

 

पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, " कर्तव्याप्रती दृढ वचनबद्धता दाखवत, @GMSRailway च्या CTI (मुख्य तिकीट निरीक्षक) श्रीमती रोझलिन अरोकिया मेरी, भारतीय रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्‍यांमध्ये ₹ 1.03 कोटी दंड वसूल करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 

तरुणानं स्कर्ट घालून लोकलमध्ये केला रॅम्प वॉक, हा व्हायरल मामला नक्की काय आहे?

एका वापरकर्त्याने लिहिले, "आमच्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी आम्हाला अशाच आव्हानात्मक आणि समर्पित महिलांची गरज आहे. रोझलीन यांचे अभिनंदन अशाच प्रगती करत राहा. अजून एका युजरनं म्हटलं की, रोझलिन, मला तुझा मित्र असल्याचा अभिमान आहे.तु झ्या कर्तृत्वाने मला आश्चर्य वाटले नाही. तुझ्या कर्तव्याप्रती तुझे समर्पण, वचनबद्धता आणि प्रामाणिकपणा दाखवते."

Web Title: Railway ministry lauds 1st woman ticket checker to collect over rs 1 cr fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.