Rajasthani girl : राजस्थानमधील एका तरूणीचा एका ब्लॉगरसोबत बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यानंतर ही तरूणी इंटरनेट सेंसेशन बनली. विना मेकअप पारंपारिक कपड्यांमध्ये ज्योती नावाची ही तरूणी ब्लॉगरसोबत बोलत आहे. ब्लॉगरसोबत बोलताना ती लाजतही आहे आणि तिला हसूनही आवरता येत नाहीये. सोशल मीडिया यूजर्सकडून तरूणीच्या सौंदर्याचं, पारंपारिक कपड्यांचं आणि साधेपणाचं कौतुक करण्यात येत आहे.
ब्लॉगरसोबत बोलताना तरूणीनं सागितलं की, पहिल्यांदाच कुणीतरी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. अनेक यूजर्स हेच म्हणत आहेत की, 'ती खरंच खूप सुंदर आहे'. तर काहींनी तिच्या सुंदर डोळ्यांचं कौतुक केलं आहे.
ज्योतीचा केवळ व्हिडिओट नाही तर तिचे फोटोही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. भारतीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून लोक तिचे हे फोटो शेअर करत आहेत. काही स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, अनेक परदेशी पर्यटक तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही थांबले होते. ज्यामुळे लोकांमध्ये ती आणखी पॉप्युलर झाली आहे.