Join us  

'थ्री इडियट्स'मधल्या राजू रस्तोगीच्या आईची सोशल मीडियात ‘व्हायरल’ चर्चा, ती नेमकी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 2:22 PM

Raju’s Mother Character in 3 Idiots Was Played by Amardeep jha not Vineeta Singh : राजूच्या आईची भूमिका नक्की कोणी केली यावरुन आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे

ठळक मुद्देअशाप्रकारे फोटोशॉप करुन ट्रोल केल्याबद्दल विनिता सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही पोस्ट फेक असल्याच्या कारणामुळे आता या पेजवरचा फोटो ब्लॉक केल्याचे दिसते.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि त्यावरुन चर्चांना उधाण येईल सांगता येत नाही. 'थ्री इडीयट्स' हा एकेकाळी जोरदार गाजलेला चित्रपट. य़ामधील रँचोसोबतच राजू रस्तोगी आणि फरान कुरेशीची भूमिकाही जोरदार गाजली. या तिन्ही भूमिका अनुक्रमे आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांनी केली होती. या काळात महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांनी तर या चित्रपटाला इतके डोक्यावर घेतले की अनेक जण रँचो किंवा राजूमध्ये स्वत:ला पाहायला लागले (Raju’s Mother Character in 3 Idiots Was Played by Amardeep jha not Vineeta Singh). 

(Image : Facebook)

भारतीय शिक्षण व्यवस्था दाखवणारा विनोदी शैलीमधील चित्रपट म्हणून आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मुख्य भूमिकांबरोबरच यातील प्राध्यापक वीरु सहस्त्रबुद्धे, चतुर, पिया, राजूचे पालक  यांच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या. राजूच्या आईची भूमिका नक्की कोणी केली यावरुन आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून ही भूमिका शुगर कॉस्मेटीक्सच्या मालक विनिता सिंग यांनी केल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्यावरुन अनेकांनीसिंग यांचे फोटो घेऊन त्यावरुन मिम्स बनवत चर्चांना वाचा फोडली आहे. मात्र विनिता सिंग यांनी चित्रपटात काम केलेले नसून प्रत्यक्षात ही भूमिका अमरदिप झा यांनी साकारली आहे.

 

या दोघींचा चेहरा काहीसा सारखा असल्याने लोकांचा गैरसमज झालेला असण्याची शक्यता आहे. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाही विनिता आपल्या कंपनीच्या कामात व्यस्त होत्या. त्यामुळे ही भूमिका अमरदिप झा यांनीच केलेली आहे. Dr. APJ Abdul Kalam Film या पेजवर या दोघींचा फोटो फोटोशॉप करुन पोस्ट करण्यात आला होता. मात्र फेसबुकनेही ही पोस्ट फेक असल्याच्या कारणामुळे आता या पेजवरचा फोटो ब्लॉक केल्याचे दिसते. विनिता सिंग यांनी या संदर्भात ट्विट केले असून अशाप्रकारे फोटोशॉप करुन ट्रोल केल्याबद्दल विनिता सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असे करणे थांबवा असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडिओही अपलोड केला असून त्याच्या शेवटी ऑल इज वेल असा मेसेजही दिला आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाव्हायरल फोटोज्मिम्स