(Image Credit- jagran.com)
भारतीय समाजात रक्षाबंधन हा महत्वपूर्ण सण मानला जातो. हिंदूंशिवाय इतर धर्मातील लोकसुद्धा बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणारा रक्षाबंधनाचा सण आनंदानं साजरा करतात. या पर्वाबाबत अनेक लोककथा प्रचलित आहेत. बहिण भावाचे प्रेम आणि समर्पणाचे प्रतिक म्हणून या सणाकडे पाहिलं जातं. तुमचा विश्वास बसणार पण बिहारमध्ये बहिण भावाचं मंदीरसद्धा आहे. या मंदिरात बहिण भावाची पूजा केला जाते. सिवान जिल्ह्यातील भीखाबांध गावात हे मंदीर आहे. या ठिकाणी मोठी जत्रासुद्धा भरते.
कोरोना संक्रमणामुळे यावर्षी जत्रा नाही
कोरोना माहामारीला रोखण्यासाठी यावेळी भीखाबांधच्या ऐतिहासिक बहिण भावाच्या मंदिराची जत्रा भरणार नाही. तरीही सोशल डिस्टेसिंग ठेवून आजच्या दिवशी बहिण भावाची पूजा केली जात आहे. भीखाबांधमधील बहिण भावाचे हे मंदिर भावंडांचे अटूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतिक आहे.
मंदिराचे ऐतिहासिक महत्व
या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. मुगल शासकांच्या काळात एका भाऊ रक्षाबंधनाच्या २ दिवस आधी आपल्या बहिणीला डोलीत बसवून भभुआ (कैमूर) या आपल्या गावी आणत होता. भीखाबांध गावाजवळील मुगल शिपायांनी डोलीत बसलेल्या मुलाला पाहिले आणि तिची सुंदरता पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डोली थांबवून या मुलीची छेडछाड करून तिला प्रचंड त्रास दिला. त्याचवेळी आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी भावानं या शिपायांना अडवण्याचा प्रयत्न केला. असं मानलं जातं की याचवेळी धरणी मातेनं या दोघांनाही स्वतःमध्ये सामावून घेतलं. डोली उचलणाऱ्या तरूणांनी त्याठिकाणच्या विहिरीत उडी मारून जीव दिला. अशी कथा प्रचलित आहे.
असे म्हटले जाते की या घटनेनंतर काही दिवसांनी, एकाच ठिकाणी दोन वटवृक्ष बाहेर आले, जे अनेक गुंठा जमिनीवर पसरले. ही झाडं जणू एकमेकांना संरक्षण देत आहेत. या झाडाची पूजा करणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. यानंतर येथे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात भाऊ आणि बहिणीसह झाडाची पूजा केली जाते. सोनार जातीचे भाऊ आणि बहिणी असल्यामुळे, सर्वप्रथम त्यांच्या जातीच्या लोकांकडून पूजा केली जाते, असाही समज आहे.
रक्षाबंधनाच्या २ दिवस आधीपासून पूजा केली जाते
दरवर्षी रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी पूजा सुरू होते, परंतु यावेळी मंदिर कोविड संसर्गामुळे बंद आहे. बिहारमध्ये मंदिर उघडण्याची परवानगी सरकारने अद्याप दिलेली नाही. आजपर्यंत या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रशासकीय पातळीवर कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. या मंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि वटवृक्ष जतन करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.