Join us  

Raksha Bandhan 2022 : भावाला मिळाली बहिणीची माया! २ वर्षांपासून टिंडरवर शोधत होता बहिण, एक सोडून दोन मिळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 6:53 PM

Raksha Bandhan 2022 : आपल्या बहिणीच्या शोधात गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावरील माहिती बदलण्यास सुरुवात केली.

ज्यांना बहिण नसते त्यांना नेहमीच आपल्याला लहान किंवा मोठी बहिण असायल हवी होती असं वाटतं. आईनंतर आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे ताई.  लोक अनेकदा त्यांचे प्रेम, जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग अॅप टिंडरवर अकाऊंट उघडतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण एक तरूण जवळपास २ वर्षांपासून टिंडरवर रक्षाबंधनसाठी बहिणीचा शोध घेत आहे. (Raksha bandhan 2022) रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या शोधात टिंडरवरील एका व्यक्तीने आपला बायो बदलला. त्या व्यक्तीने आपल्या बायोमध्ये लिहिले आहे की, तो रक्षाबंधन साजरा करण्यासाठी बहिणीच्या शोधात आहे. बघता बघता या टिंडर वापरकर्त्याला रक्षाबंधनासाठी एकाच वेळी दोन बहिणी मिळाल्या.

त्या व्यक्तीने Reddit वर एका पोस्टमध्ये टिंडरचे आभार मानले आणि लिहिले, 'टिंडरचे आभार!.... आता मला दोन बहिणी आहेत, त्या दोघीही मी टिंडरवर भेटलो. यावर्षी आम्ही तिघेही एकत्र रक्षाबंधन साजरे करण्याचा आणि भेटवस्तू वाटण्याचा विचार करत आहोत.

या व्यक्तीने पुढे लिहिले की, 'आयुष्यभर एकही बहीण नसल्यामुळे त्याला रक्षाबंधनाला कसे एकटे वाटू लागले.  राखी बांधायला किंवा जिच्यासाठी तो भेटवस्तू विकत घेऊ शकत असे कोणी नव्हते. त्याने आपल्या बहिणीच्या शोधात गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावरील माहिती बदलण्यास सुरुवात केली. यंदा त्याचे नशीब खुलले आहे.

केवळ बहिणीच नाही तर लोक डेटिंग अॅप्सवर अपार्टमेंटही शोधत आहेत. केरळमधील एका व्यक्तीने मुंबईत अपार्टमेंट शोधण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर केल्याचे ट्विटरवर व्हायरल झाले. खरंतर एक व्यक्ती डेटिंग अॅपवर लोकांना अपार्टमेंट शोधण्यासाठी मदत मागत होती. त्यांचे ट्विट नेटिझन्समध्ये बराच काळ चर्चेचा विषय राहिले.

टॅग्स :आरोग्य