सण म्हटला की प्रत्येकाच्या घरीच उत्साहाचे वातावरण असते. मग ते अगदी हातावर पोट असणारा कष्टकरी वर्ग असो किंवा मग बॉलीवूड स्टार्स असो. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वत:ला झेपेल तसे उत्साहात सण साजरे करतोच. आता तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोकांनी जसा सण साजरा केला, मिळेल तेवढ्या वेळेसाठी भावाबहिणीची भेट घेतली, नाही भेट झाली तर सोशल मिडियावरून, फोनवरून शुभेच्छा दिल्या, तसंच काहीसं सेलिब्रिटींनीही केलंच बरं का (Rakshabandhan Celebration 2023 by Celebrities)... त्याचीच ही बघा छोटीशी झलक. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Sara Ali Khan, Madhuri Dixit, Genelia D'Souza, Amruta Khanvilkar)
१. सारा खान
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा खान हिने खान पतौडी कुटूंबियांसमवेत राखीपौर्णिमा साजरी केली.
यावेळी करिना कपूर, सैफ अली खान, करिना कपूर, सोहा अली खान असे सगळे कुटूंबिय होते. हम नौ साथ है... असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
२. अमृता खानविलकर
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिचा आणि तिच्या बहिणीचा लहानपणीचा फोटो साेशल मिडियावर शेअर करून बहिणीला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Here’s to always protecting the loved and dear ones... अशी कॅप्शन तिने त्या पोस्टला दिली आहे.
३. जेनेलिया डिसुझा
मोहक हास्याने सगळ्यांची मने जिंकणारी गोड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिनेही भावाला भरभरून शुभेच्छा देत राखीपौर्णिमेचा सण साजरा केला.
कलर केलेल्या केसांचा रंग टिकेल खूप दिवस, लावा जास्वंदाच्या फुलांचं खास कंडिशनर, केस चमकतील
पोस्टमध्ये ती भावाला म्हणतेय की आपण दोघे एकमेकांपेक्षा कितीही वेगळे असलो तरी आपल्यामधला बॉण्ड अतिशय घट्ट आहे. कुणीही आपल्यामध्ये येऊ शकत नाही. भावाने आज स्वत:च्या कर्तुत्वावर जे काही कमावलंय त्याचा तिला खूप अभिमान आहे, असंही ती म्हणतेय.
४. माधुरी दिक्षित
अभिनेत्री माधुरी दिक्षित हिने भावाला औक्षण करण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत चाहत्यांनाही रक्षाबंधनाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.