बरेचसे जण कपड्यांवरून लोकांचा स्वभाव, वागणूक किंवा तो/ ती व्यक्ती कशी असेल हे ठरवून मोकळे होतात. पण कपड्यांवरून एखाद्याशी कसं वागावं याची व्याख्या कशी काय ठरवली जाऊ शकते, असं सवाल रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) यांनी एका मुलाखतीत उपस्थित केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आपल्या अभिनय आणि बोल्ड वक्तव्यासाठी ओळखली जाते.
तिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत 'तुमचे कपडे तुमची ओळख दर्शवत नाही. तुमचा आत्मविश्वास दर्शवतो.' (Empower Women) यासह 'प्रत्येकाने तुम्हाला पसंत करायलाच हवे, अशातला काही भाग नाही.' असंही ती म्हणाले. या वक्तव्याला काहींनी समर्थन दर्शवलं तर, काहींनी ट्रोल केलं आहे. पण नेमकं ती काय म्हणाले? तिचं म्हणण्याचं नेमका हेतू काय? पाहूयात(Rakul Preet Singh says your clothes don’t define you, your self confidence does).
रकुल प्रीत सिंग म्हणते..
दिलेल्या स्टेण्टमेण्टसाठी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. ती म्हणते, 'तुम्ही जे कपडे घालता, त्यावरून तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असाल हे ठरवणं चुकीचे आहे. तुम्ही जे बोलता, ते तुम्ही आहात. तुम्ही ते आहात, जे तुम्ही दर्शवता. जे तुम्ही बोलण्याद्वारे लोकांसमोर व्यक्त होता.'
फ्रिजरमध्ये तयार झालाय बर्फाचा भलामोठा डोंगर? ६ घरगुती टिप्स; वेळीच साफ करा अन्यथा..
ती पुढे म्हणते, 'तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला यायला हवे. विश्वास हा सर्वात महत्वाचा असतो. यामुळे आपल्यातला कॉन्फिडन्स वाढतो. प्रत्येकालाच आपण आवडू किंवा आपली मतं आवडतील अशातलाही काही भाग नाही. ते शक्यही नाही. मी स्वतःवर प्रेम करते, आणि मला ते ठाऊक आहे, ते प्रेम भ्रामक नाही आहे.' सध्या तिच्या या वक्तव्याला अनेकांनी समर्थन दर्शवलं असून, नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने
जॅकी भगनानीसोबत अडकली लग्नबंधनात
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा लग्नसोहळा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी गोव्यात थाटामाटात पार पडला. प्रीत आणि जॅकीने प्रथम शीख रितीरिवाजांनुसार आनंद कारज सेरेमनी फॉलो करत लग्न केले. नंतर सिंधी रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न केले. या लग्नात त्यांचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी याशिवाय बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.