Lokmat Sakhi >Social Viral > Simple Ram Mandir Rangoli : रामललांच्या स्वागताला १० मिनिटांत काढा रांगोळी; चमचा, पीन, टूथपिकने काढता येतील सोप्या डिजाईन्स

Simple Ram Mandir Rangoli : रामललांच्या स्वागताला १० मिनिटांत काढा रांगोळी; चमचा, पीन, टूथपिकने काढता येतील सोप्या डिजाईन्स

Ram Mandir Rangoli Design Easy : देव्हाऱ्यासमोर किंवा घरासमोर काढता येतील अशा रांगोळ्याच्या सोप्या डिजाईन्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 02:41 PM2024-01-21T14:41:27+5:302024-01-21T14:46:31+5:30

Ram Mandir Rangoli Design Easy : देव्हाऱ्यासमोर किंवा घरासमोर काढता येतील अशा रांगोळ्याच्या सोप्या डिजाईन्स पाहूया.

Ram Mandir Rangoli Design Easy : Easy Simple Ram Mandir Rangoli for 22 January | Simple Ram Mandir Rangoli : रामललांच्या स्वागताला १० मिनिटांत काढा रांगोळी; चमचा, पीन, टूथपिकने काढता येतील सोप्या डिजाईन्स

Simple Ram Mandir Rangoli : रामललांच्या स्वागताला १० मिनिटांत काढा रांगोळी; चमचा, पीन, टूथपिकने काढता येतील सोप्या डिजाईन्स

रांगोळी (Rangoli) काढल्याने दाराची शोभा वाढते. मोठ्या उत्सवांना आपल्या दारात रांगोळी काढावी असं प्रत्येकालाच वाटतं पण सर्वांनाच व्यवस्थित रांगोळी काढता येते असं नाही.  (Simple Ram Mandir Rangoli Designs) कमी वेळात आकर्षक रांगोळी काढण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्सचा वापर करू शकता. २२ जानेवारीला अयोध्येत  रामललांच्या प्राण प्रतिष्ठेचा (Ram Mandir Inauguration) सोहळा पार पडणार आहे. (Jai Shree Ram Rangoli Simple Designs)

या निमित्ताने देशभरात जल्लोषाचे वातावरण असून लोक आपापल्या परीने रामललांच्या स्वागताची तयारी करत आहेत. देव्हाऱ्यासमोर किंवा घरासमोर काढता येतील अशा रांगोळ्याच्या सोप्या डिजाईन्स पाहूया. जर तुम्हाला पटकन आकर्षक  रांगोळी काढायची असेल तर चमचा, थाळी, माचिसच्या काडीचा वापर करू शकता. (Beautiful Ayodhya Ram Mandir Special Rangoli)

फुलांची रांगोळी

वेगवेगळ्या रंगाचे ठिपके काढून टुथपिकच्या साहाय्याने फुलाचा आकार द्या. या फ्लोरल डिजाईन्स  उत्तम ठरतात. यासाठी ४ ते ५  रंगाचे कॉम्बिनेशन निवडा. यात तुम्हाला फार काही डिजाईन काढायचे नसेल तर तुम्ही जय श्री राम असं लिहू शकता.  कमी जागेत काढण्यासाठी ही रांगोळी उत्तम आहे. 

रामललांच्या स्वागतासाठी दारापुढे काढा १० सोप्या रांगोळी डिजाईन्स; पाहा राम मंदीराची खास रांगोळी

खडूने काढा रांगोळी

जर तुमची ड्रॉईंग फार चांगली नसेल तर आधी खडूच्या मदतीने श्री रामांची आकृती काढून घ्या. त्यानंतर रंग भरून बॉर्डर तयार करा. डिजाईन्स तयार करण्यासाठी हेअर पिन किवा टूथ पिकचा वापर करू शकता.  

गोलाकार डिजाईन

श्री राम मंदिराची झलक घराच्या अंगणात दिसण्यासाठी तुम्ही छाप किंवा ठश्याच्या मदतीने डिजाईन्स तयार करू शकता. याच्या बॉर्डरसाठी चमचा,  मासिचच्या काडीचा वापर करा. तुम्ही राम मंदिराची आकृती काढून त्यावर जय श्री राम लिहू शकता. आजूबाजूला रंगेबेरंगी फूलं तयार करा. जर तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही ताटाचाही वापर करू शकता.

अतिशय बुद्धीमान होतात लहानपणी 'या' सवयी असलेली मुलं; सायकोलॉजी सांगते स्मार्टनेसचं सिक्रेट

धनुष्यबाण

धनुष्यबाणाची रांगोळी काढण्यासाठी सगळ्यात आधी ३ पार्ट्स करा. त्यात तुम्ही आपल्या आवडीनुसार वेगवेगळी डिजाईन काढू शकता.  पांढऱ्या आणि भगव्या रंगाचा ही रांगोळी काढताना वापर करा. याशिवाय तुम्ही फुलांच्या रांगोळ्याही काढू शकता. तसंच घराच्या पायऱ्यावर श्री राम अशा अक्षरात डिजाईन्स काढा.

Web Title: Ram Mandir Rangoli Design Easy : Easy Simple Ram Mandir Rangoli for 22 January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.