गरोदरपणाचा काळ हा कोणत्याही स्त्रीसाठी फार सुखावह नसतोच. मातृत्व मिळणार असल्याचं मानसिक समाधान असलं तरी या काळात होणाऱ्या वेगवेगळ्या शारिरीक त्रासांनी ती हैराण झालेली असते. यातच तिच्या शरीराचा बदलणारा आकार, त्यात होणारे अनेक बदल स्विकारणं तिच्यासाठी तेवढं सोपं नसतंच. मग अशा काळात जर तिला तिच्या वाढत्या वजनावरून किंवा सुटलेल्या पोटावरून टोमणे ऐकावे लागत असतील, तर ती गोष्ट नक्कीच तिच्यासाठी निराशाजनक असू शकते. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री आलिया भटचं. आता नवरा रणबीर कपूरने तिच्या वाढत्या पोटाला उद्देशून तिच्यावर एक जाेक मारला (Ranbir Kapoor cracked joke about Alia Bhat's weight gain and baby bump). यामुळे आलियाला नेमकं काय वाटलं, ते माहित नाही. पण रणबीरच्या त्या बोलण्याने नेटीझन्स मात्र त्याच्यावर भयंकर संतापले आहेत. (Ranbir Kapoor is getting trolled)
त्याचं झालं असं की रणबीर आणि आलियाचा एक ऑनलाईन इंटरव्ह्यू सुरू होता. यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही दोघांनी मिळून, सगळीकडे फिरून या चित्रपटाचा जोमात प्रचार का नाही केला. या प्रश्नाला आलिया तिच्यापरीने उत्तर देत होती. पण ती बोलत असताना रणबीरने तिला तोडत मध्येच उडी घेतली आणि आलियाच्या वाढत्या पोटाकडे बघत तो म्हणाला की 'कोई और फैल रहा है..'. हे सांगण्यासाठी त्याने 'फैलाओड' (phailoed) हा शब्द वापरला. याचा अर्थ पसरणे असा होतो.
During an interview, Ranbir Kapoor jokingly made a comment on Alia Bhatt for gaining weight post pregnancy. However, this joke has not gone well with Netizens. #RanbirKapoor#AliaBhattpic.twitter.com/VMVBHePWEb
— One world news (@Oneworldnews_) August 19, 2022
रणबीर मध्येच असं काही बोलेल हे आलियाला अजिबातच अपेक्षित नव्हतं. त्यामुळे क्षणभर ती एकदम भांबावून गेली. तिला त्यावर काय रिॲक्ट करावं ते समजलं नाही.
रणबीरने तिला त्याच वेळी सॉरी म्हटलं. पण सोशल मिडियावर मात्र याचे खूपच वेगळे पडसाद उमटले. नेटीझन्स त्याच्यावर खूपच खवळले असून गरोदर बायकोवर असे जोक मारणारा तो एक बेजबाबदार नवरा आहे, इथपर्यंत त्याच्यावर कमेंट्स आल्या आहेत. शेवटी सोशल मिडियावर उसळलेला रोष पाहून रणबीरने आलियाची आणि सगळ्यांची जाहीर माफीदेखील मागितली.