Lokmat Sakhi >Social Viral > रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय?

रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय?

Alia Bhatt's emails to daughter Raha: बघा आलिया भट तिच्या मुलीला म्हणजेच राहाला जो इ- मेल करते, त्यात नेमकं काय लिहिते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 05:52 PM2023-10-16T17:52:58+5:302023-10-16T17:54:01+5:30

Alia Bhatt's emails to daughter Raha: बघा आलिया भट तिच्या मुलीला म्हणजेच राहाला जो इ- मेल करते, त्यात नेमकं काय लिहिते...

Ranbir Kapoor says Alia Bhatt writes emails to daughter Raha every day | रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय?

रणबीर कपूर सांगतो, आलिया रोज न चुकता राहासाठी एक इ- मेल लिहिते! पण त्यात नेमकं लिहिते काय?

Highlightsराहा मोठी झाल्यावर तिच्यासाठी आईचे हे इ- मेल वाचणं हा नक्कीच एक वेगळा अनुभव असू शकतो. 

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांची मुलगी राहा (Raha) आता लवकरच एक वर्षाची होणार आहे. अजूनही त्या दोघांनी जाणिवपुर्वक राहाला सोशल मिडियापासून दूर ठेवलं आहे. तिचा चेहरा अजूनही त्यांनी चाहत्यांना दाखवलेला नाही. काही दिवसांपुर्वी राहाची एक पुसटशी झलक चाहत्यांना पाहायला मिळाली होती. पण त्यातही ती नेमकी कशी दिसते, याचा अंदाज अजूनही आलेला नाही. राहाविषयीच्या चर्चा मात्र खूप ऐकायला येतात. आता खुद्द रणबीरनेच तिच्याविषयीचा एक किस्सा सांगितला असून तो साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात रणबीर असं सांगत होता की राहाची आई म्हणजेच आलिया तिच्यासाठी रोज एक मेल (emails) आठवणीने न चुकता लिहिते.

 

एका यु- ट्यूब चॅनलला रणबीर कपूरने एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीदरम्यान त्याने हा मेल लिहिण्याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की आलिया रोज रात्री राहासाठी एक मेल आठवणीने लिहितेच.

करिश्माचं करिअर व्हावं म्हणून आई तिच्या पाठीशी उभी राहिली, माझ्यावेळी मात्र.. करिना कपूर सांगतेय..

ते पाहून मलाही आता तिच्यासाठी मेल लिहावे वाटतात आणि त्याची सुरुवात मी आता लवकरच करणार आहे. पुढे सांगताना तो असंही म्हणाला की लहान असताना तो त्याच्या आई- बाबांना एकमेकांना पत्र लिहिताना पाहायचा. एवढेच नाही तर त्याचे आजी- आजोबाही एकमेकांना पत्र लिहायचे. जुनी पत्रे काढून तासनतास वाचत बसायचे. त्यामुळेच पत्र लिहिण्याचा आणि जुनी पत्रं काढून ती वाचत बसण्याचा आनंद काय असतो, तो त्याला माहिती आहे. 

 

सध्याच्या इमेलच्या किंवा मेसेजच्या दुनियेत पत्रांमधून मिळणारा हा निखळ आनंद हरवून तर जाणार नाही ना, अशी भितीही रणबीरने व्यक्त केली.

मुलं अभ्यास करताना सारखी चुळबूळ करतात- एकाजागी बसतच नाहीत? ३ सोपे व्यायाम, मुलांची वाढेल एकाग्रता

त्याचा स्वत:चा किस्सा सांगताना तो म्हणाला की आई- बाबांचं, आजी- आजोबांचं पत्रलेखन पाहून तो ही त्याच्या लहानपणी अनेक लव्ह लेटर्स लिहायचा. त्यातून वेगळाच आनंद मिळायचा असंही त्याने सांगितलं. आता आलिया राहासाठी जे काही लिहिते, ते खूप वेगळं असतं असं काहीच नाही. रोजच्या रोज जे काही होतं, ते ती तिच्यासाठी लिहून ठेवते. राहा मोठी झाल्यावर तिच्यासाठी आईचे हे इ- मेल वाचणं हा नक्कीच एक वेगळा अनुभव असू शकतो. 

 

Web Title: Ranbir Kapoor says Alia Bhatt writes emails to daughter Raha every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.