Join us  

रणबीर कपूर सांगतो लहानपणी 'हा' होता करिना- रिधीमाच्या आवडीचा खेळ, आणि त्यात मी नेहमीच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2024 1:25 PM

Ranbir Kapoor Shared His Childhood Memories: अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) तिच्या आवडीचा खेळ खेळताना रणबीर कपूरला कसा त्रास द्यायची पाहा...

ठळक मुद्दे'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात एकदा रणबीर कपूर आणि करिना कपूर दोघेही सहभागी झाले होते. त्यावेळी रणबीरने त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला.

कपूर घराण्याविषयी नेहमीच त्यांच्या चाहत्यांना आकर्षण वाटत आले आहे. राज कपूर यांच्यापासून ते अगदी रणबीर कपूरची लेक राहा कपूर हिच्यापर्यंत प्रत्येकाभोवतीचं प्रसिद्धीचं वलय आहे आणि त्यांच्या चाहत्यांना नेहमीच या कपूर मंडळींविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी, चर्चा ऐकायला आवडतात. आता रणबीर कपूर आणि करिना कपूर (Kareena Kapoor) ही चुलत भावंडं. इतर सर्वसामान्य भावंडं लहानपणी जशी एकत्र खेळतात तसेच हे तेव्हाचे स्टार किड्स आणि आताचे स्टार्सही लहानपणी एकत्र खेळलेले आहेत (Ranbir Kapoor shared his childhood memories). याच त्यांच्या खेळाविषयीचा (kareena kapoor's favourite childhood game) एक मजेशीर किस्सा रणबीर कपूरने 'Koffee With Karan' या कार्यक्रमात सांगितला होता.

 

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात एकदा रणबीर कपूर आणि करिना कपूर दोघेही सहभागी झाले होते. त्यावेळी रणबीरने त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की त्यावेळी तो ४ वर्षांचा होता आणि त्याची बहिण रिधिमा आणि करिना या दोघी ६ वर्षांच्या होत्या.

पब्लिक टॉयलेटमधली ही गोष्ट चुकूनही वापरू नका, तज्ज्ञ सांगतात बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी.... 

त्या दोघी एकत्र आल्या की त्यांच्या आवडीचा भातुकलीचा खेळ त्या खेळायच्या. त्यात त्यांची वेगवेगळी घरं असायची आणि मला मात्र त्या खूप छळायच्या. या खेळात त्या मला त्यांचा नवरा व्हायला सांगायच्या. आणि मोठ्या बहिणी असल्याने दादागिरी करून मला तो खेळ खेळायलाच लावायच्या. 

 

रणबीरने हा किस्सा सांगताच करिना आणि करण जोहर दोघांनाही हसू आलं. यानंतर करणने करिनाला विचारलं असता तिला हा किस्सा आठवत नसल्याचं तिने सांगितलं. "Oh god, that is very insensible, and I am glad that I don't remember this." असं म्हणत ती चांगलीच लाजली.

चेहऱ्याला लावा ४ घरगुती पदार्थांपासून तयार केलेलं ब्लीच- डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन होईल कमी 

हल्लीच्या मुली भातुकली खेळत नसल्या तरी मागच्या पिढीपर्यंतच्या बहुतांश मुली भातुकलीच्या खेळात रमून जायच्या. त्यात त्यांचं स्वत:चं विश्व तयार करायच्या. करिना आणि रिधिमा या दोघीही यापैकीच आहेत, हे रणबीरने सांगितलेल्या गमतीतून दिसून आलं.  

टॅग्स :सोशल व्हायरलरणबीर कपूरकरिना कपूर