Join us  

म्हणजे बायकांच्या जगण्याला काही किंमतच नाही का? ॲनिमल सिनेमाच्या निमित्ताने सोशल मीडियातला चर्चेतला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2023 5:35 PM

Ranbir Kapoor’s Animal has ‘several scenes of domestic abuse in which men strike, humiliate, coerce and manipulate women : सिनेमा आणि त्यातली महिलांची भूमिका हा नेहमी चर्चेचा विषय असतो, सध्या तोच प्रश्न पुन्हा चर्चेत आहे, महिलांचं जगणं दुय्यम का दाखवता?

ॲनिमल (Animal) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा आहे. हा सिनेमा पुरुष वर्चस्ववादी असून त्यात स्त्रियांना अत्यंत कमी लेखले आहे अशी सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे. अनेकजणांनी सिनेमा पाहून आल्यावर मतं मांडली की आपण स्त्रियांना पुन्हा जुनाट बंधनात अडकवणार का? अल्फा मेल म्हणताना स्त्रियांचे माणूस म्हणून जगण्याचे हक्क नाकारणार का? अशी चर्चा आहे (Toxic Relationship).

टॉक्सिक रिलेशनशिपमध्येही स्त्रियांनी नमते घेऊन जुळवून घ्यावे अशी अपेक्षा आहे का? किंवा स्त्रिया केवळ भोगवस्तू आहे का? अशी अनेक मतं दिसतात. काहींना अर्थात सिनेमा आवडला आहे. मात्र ही चर्चा सिनेमाची नाही तर त्यानिमित्ताने स्त्रियांचं चित्रण कसं होतं आहे याला अनेक महिला आणि पुरुष आक्षेप घेत आहे(Ranbir Kapoor’s Animal has ‘several scenes of domestic abuse in which men strike, humiliate, coerce and manipulate women).

या सिनेमाच्या कथेत दाखवल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा मारेकरी शोधण्यासाठी नायक एका मुलीशी अनैतिक संबंध ठेवतो. आपले बूट चाट असं तिला सुचवतो, हे अनेकांना खटकले आहे.

गरब्याचा जागतिक सन्मान, युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित! गरब्याच्या तालावर जग थिरकणार

सिनेमाचा नायक आपल्या पत्नीलाही सतत गृहित धरतो. तिच्याशी बळजबरी करतो. त्यांच्यात सतत वाद आणि शारीरिक झटापटही होते हे काही निकोप नात्याचं लक्षण नाही आणि असं कुणी वागत असेल तर बायकांनी सहन करु नये अशी मतंही अनेकजण सोशल मीडियात मांडताना दिसतात.

बहिणी, प्रेयसी, बायको या सगळ्यांशी नायक जसा वागतो ते वागण्याचं उदात्तीकरण करु नये, महिलांचं हे चित्रण बरं नाही अशीही मतं दिसतात.

'गेलेला पैसा मी परत कमवू शकते, पण आई..' गरीबीतले दिवस आठवून लाफ्टर क्वीन भारती सांगते..

सिनेमात महिलांचं चित्रण हा जुनाच विषय आहे, त्यांची भूमिका, त्यांची कर्तबगारी ते शोषण याविषयी आजवर अनेक अभ्यास झाले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा तीच चर्चा आहे.

टॅग्स :रणबीर कपूरसोशल व्हायरलसोशल मीडियारश्मिका मंदाना