Lokmat Sakhi >Social Viral > रणबीर कपूर म्हणाला "आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे....", त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया...

रणबीर कपूर म्हणाला "आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे....", त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया...

Ranbir Kapoor's Opinion About Working Women: आई झाल्यानंतर महिलांनी काम करावं की नाही, याविषयी रणबीर कपूरने नुकतंच त्याचं मत मांडलं आहे. बघा याविषयी बोलताना तो नेमकं काय म्हणाला.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2023 12:03 PM2023-12-02T12:03:50+5:302023-12-02T13:23:50+5:30

Ranbir Kapoor's Opinion About Working Women: आई झाल्यानंतर महिलांनी काम करावं की नाही, याविषयी रणबीर कपूरने नुकतंच त्याचं मत मांडलं आहे. बघा याविषयी बोलताना तो नेमकं काय म्हणाला.....

Ranbir Kapoor's opinion about a woman to give up on things once she’s married or has a child... | रणबीर कपूर म्हणाला "आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे....", त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया...

रणबीर कपूर म्हणाला "आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे....", त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया...

Highlightsतो म्हणतो की आपल्याकडे आई झाल्यानंतर महिलांनी काम थांबवणं किंवा त्यांच्या कामात स्लो डाऊन होणं याच्याकडे एक नियम असल्यासारखं पाहिलं जातं.

रणबीर कपूर आणि आलिया भट (Ranbir Kapoor and Alia Bhat) हे बॉलीवूडचं एक बहुचर्चित सेलिब्रिटी कपल. त्यांच्या लग्नाची जशी जोरदार चर्चा होती, तशीच नंतर आलियाच्या प्रेग्नन्सीची आणि डिलेव्हरीचीही झाली. त्यांची मुलगी राहा आता नुकतीच १ वर्षाची झाली आहे. राहाच्या जन्मानंतर अवघ्या २- ३ महिन्यांतच आलियाने कामाला सुरुवात केली होती. त्याविषयीही बरंच उलटसुलट बोललं गेलं. तिच्या या लवकर कामाला सुरुवात करण्याच्या ठोस निर्णयामागे रणबीर कपूरचा ॲटिट्यूट कारणीभूत असावा, असं नुकतंच रणबीर एका मुलाखतीदरम्यान जे काही बोलला त्यावरून दिसून येतं. (Ranbir Kapoor's opinion about a woman to give up on things once she’s married or has a child...)

 

shethepeopletv या इन्स्टाग्राम पेजवरून रणबीरच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये बाळंतपणानंतर महिलांनी काम करावं की नाही याविषयी रणबीर बोलला आहे.

थंडीमुळे हाताचे कोपरे कोरडे पडून जास्तच काळवंडले? ३ उपाय करा- टॅनिंग निघून कोपरे होतील स्वच्छ

तो म्हणतो की आपल्याकडे आई झाल्यानंतर महिलांनी काम थांबवणं किंवा त्यांच्या कामात स्लो डाऊन होणं याच्याकडे एक नियम असल्यासारखं पाहिलं जातं. पण ते मुळीच गरजेचं नाही. याविषयी अत्यंत पॉझिटीव्हपणे बोलताना तो म्हणाला की काम करण्याची त्या स्त्री ची इच्छा असेल, तिचं काम हे तिचं पॅशन असेल तर तिने तिला वाटेल तेव्हा आणि तिला जमेल तसं तिच्या घरच्यांची, मित्रमैत्रिणींची मदत घेऊन काम सुरू करावं. 

 

रणबीर असंही म्हणाला की आई झाल्यानंतर एखादीने लवकर काम सुरू केलं तरीही लोक बोलणार आणि काम नाही केलं तरी लोक बोलणार.. "लोगोंका काम है केहेना, कुछ तो लोग कहेंगे...", यानुसार लोक बोलणारच.

कुंडीमध्ये मेथीची भाजी लावणं अगदी सोपं- फक्त १ काम करा आणि दररोज घरची फ्रेश मेथी खा

पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला काम करायचंय तर तुमच्या मनाचं ऐका, प्रायोरिटीज सेट करा आणि कामाला सुरुवात करा...  त्याच्या याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे आणि नवरा म्हणून त्याच्या सपोर्टमुळेच आज आलिया बाळंतपणानंतरही इतक्या सक्षमपणे, खंबीरपणे काम करत असावी. मध्यंतरी मुलीला वेळ देण्यासाठी रणबीर आता कामातून ब्रेक घेणार आहे, असं तो म्हणाला होता. त्यावेळीही एक पिता म्हणून त्याचं सोशल मिडियावर खूप कौतूक झालं होतं. 


 

Web Title: Ranbir Kapoor's opinion about a woman to give up on things once she’s married or has a child...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.