सोशल मीडिया हे इतके प्रभावी माध्यम आहे की या माध्यमातून एका रात्रीत तुमची बदनामीही होऊ शकते किंवा एका रात्रीत तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. रानू मंडल हे याचे एक उत्तम उदाहरण असून एका रात्रीत ही महिला लाखो लोकांपर्यंत पोहोचली. रेल्वे स्टेशनवर भिक मागून आपला उदरनिर्वाह करणारी रानू एका रात्रीत स्टार झाली आणि तिच्या आवाजाने भले भले चक्रावले. इतकेच नाही तर प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियासारख्या दिग्गज कलाकारासोबत गाण्याची संधी तिला मिळाली. या गोष्टींमुळे एका रात्रीत या महिलेचे आयुष्य ३६० अंशात बदलून गेले. आपल्या नवीन एखाद्या गाण्याने किंवा डान्समुळे जगाला अजिबात माहित नसलेली रानू आता सोशल मीडियावर व्हायरल होते (Ranu Mandal Dance Video).
नुकताच तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत असून यामध्ये तिने डान्स केला आहे. यामध्ये तिने ट्विंकल खन्नाच्या मेला या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. यामध्ये ती निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये लाल टॉवेल कंबरेला बांधून नाचताना दिसत आहे. तिच्यासोबत एक मुलगाही यामध्ये डान्स करताना दिसत आहे. शेखर भारती ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटीझन्सनी एकाहून एक कमेंटस करत रानू मंडल यांची खिल्ली उडवली आहे. गाण्यानंतर आता डान्स का, इतक्या वर्षांनंततर तिच्यातले टॅलेंट समोर येत आहे अशा कमेंटस केल्या आहेत. तर बरेच दिवसांत तुमचे गाणे एकही गाणे नाही आले असेही एकाने या व्हिडिओच्या खाली कमेंटसमध्ये विचारले आहे.
रानू मंडला यांना आपल्या आवाजामुळे कमी वेळात प्रसिद्धी मिळाली खरी पण त्यांना ती योग्य पद्धतीने टिकवता आली नाही. कधी त्या कच्चा बदामसारख्या ट्रेंडमध्ये सहभागी होतात तर कधी आणखी काही डान्स करत प्रसिद्धीझोतात राहायचा प्रयत्न करतात. मध्यंतरी बंगाली छटपुजेचे एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत होते. ते त्यांच्या आवाजातले गाणे आहे की गाण्यावर डान्स करते तर कधी आणखी कोणत्या. त्यामुळे कोण कधी प्रसिद्ध होईल आणि सोशल मीडियावर व्हायरल होईल याचा काही अंदाज लावता येत नाही.