सध्या सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' (Bengali Song Kacha Badam) हे बंगाली गाणं व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेते भुबन यांच्या गाण्यानं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्राम रिल्सवर या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. इंटरनेट सेन्सेशनल रानू मंडलचा हे गाणं गातानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Ranu mondal sings trending bengali song kacha badam)
रातोरात स्टार बनलेली आणि स्टारडमच्या गर्वानं पुन्हा मूळ स्थितीवर आलेली राणू मंडल तिची गाणी आणि वेगवेगळे किस्से यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिनं गायलेल्या कच्चा बदाम गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
राणू मंडल ही तीच महिला आहे जी ऑगस्ट 2019 मध्ये 1972 मधील एक प्यार का नगमा है गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात स्टार बनली. तिला पहिल्यांदा पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्थानकावर अतिंद्र चक्रवर्ती यांनी पाहिले आणि झटपट लोकप्रियता मिळाली. हिमेश रेशमियाच्या हॅप्पी हार्डी आणि हीर या चित्रपटासाठीही तिनं गाणं गायले.
Shiny_Girl78 या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, राणू मंडल कच्चा बदाम गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यापासून 48 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओमुळे लोकांनी रानू मंडलला प्रचंड ट्रोल केले. एका यूजरने लिहिले - "ओम शांती बदाम सॉन्ग." दुसर्याने लिहिले- "आरआयपी बदाम सॉन्ग." अशी कमेंट देत खिल्ली उडवली आहे.