Join us

यशाच्या शिखरावर असूनही रश्मिका मंदानाची एकच खंत, ती म्हणते- करिअर केलं पण कुटूंब.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 17:38 IST

Rashmika Mandanna About scarifying Family Time: आज एवढं यश मिळूनही अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या मनात नेमकी कसली खंत असावी बरं?

ठळक मुद्देएका मुलाखतीत रश्मिका म्हणते आहे की आज ती तिचे करिअर उत्तम करत असून नावही कमावले आहे. पण.....

अभिनेत्री रश्मिका मंदाना काही वर्षांपुर्वीपर्यंत फक्त दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. पण तिचा पुष्पा चित्रपट तुफान गाजला आणि त्यानंतर तिचा करिअरचा ग्राफ जबरदस्त वर गेला. आज बॉलीवूडमध्ये तिने तिचं स्थान निर्माण केलं आहे. आता पुन्हा एकदा 'छावा' या चित्रपटाच्या माध्यमातून ती रसिकांसमोर येण्यास सज्ज आहे. अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका या दोघांच्या प्रमुख भूमिका असणारा 'छावा' सध्या जबरदस्त चर्चेत असून तो १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित हाेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या अनुशंगाने तिची नुकतीच एक मुलाखत झाली. त्यामध्ये तिने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली. बघा नेमकं काय सलत आहे तिच्या मनात..(Rashmika Mandanna About scarifying Family Time)

 

हिंदुस्थान टाईम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिका म्हणते आहे की आज ती तिचे करिअर उत्तम करत असून नावही कमावले आहे. पण यशाच्या एकेक पायऱ्या चढत वर जात असताना मात्र ती हळूहळू तिच्या कुटूंबापासून दूर जात आहे.

मी कुरुप आहे, असं म्हणत शिल्पा शेट्टी रोज रडायची! आईने दिला खास सल्ला, वाचा..

कारण कामात ती एवढी अडकून गेली आहे की कुटूंबासाठी तिच्याकडे वेळच नाही. रश्मिका म्हणते की खूप आधीच माझ्या आईने मला एक गोष्ट सांगितली होती. ती मला म्हणायची की आयुष्यात एकतर करिअर करता येईल किंवा कुटूंबासोबत राहाता येईल. दोन्ही गोष्टींना समान न्याय देऊन तू पुढे जाऊ शकत नाही. करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर कुटूंबापासून दूर जावंच लागेल.आज मी हेच सगळं अनुभवते आहे..

 

कुटूंबापासून दूर असण्याचं वाईट तर तिला वाटतंच. पण तिला सगळ्यात जास्त त्रास या गोष्टीचा होतो की ती तिच्या लहान बहिणीला वाढताना पाहू शकत नाही. तिच्या या वाढत्या वयातले अनेक प्रसंग ती माेठी बहिण म्हणून मिस करते आहे.

केस नॅचरली काळे करण्याचा सगळ्यात सोपा उपाय! मेहेंदी, डाय लावण्याची कटकटच नाही...

पण जमेल तेव्हा मेसेज करून, फोन करून ती तिच्या बहिणीच्या आणि आई- वडिलांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. फोनमुळे आज अनेक गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत. एकमेकांना पाहणं साेपं झालं आहे. पण तरीही फोनवरून एकमेकांची चौकशी करणं आणि प्रत्यक्ष कुटूंबात राहून आपल्या माणसांचा सहवास अनुभवणं यात खूप फरक आहे ना.. आणि रश्मिकाला नेमकं तेच मिळत नाहीये. म्हणूनच तर कुटूंबाला ती प्रत्येकवेळी मिस करतेय.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलरश्मिका मंदानाविकी कौशलपरिवारबॉलिवूड