Join us  

शॉर्ट ड्रेसमुळे रश्मिकावर उप्स मोमेंटची वेळ; मुलाखतीच्या वेळी पोझिशन बदलताना घडले असे काही, नेटीझन्सनी केले ट्रोल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 2:16 PM

Rashmika mandanna oops moment : पुष्पाच्या यशानंतर सर्वजण रश्मिका मंदान्नावर कौतुकाचा वर्षाव करत असून तिला अनेक मोठ्या ऑफर्स आल्या आहेत. 

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna)  सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.  तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिचं  रूटीन फिटनेस सिक्रेट सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरलंय.  नॅशनल क्रश रश्मिकाला एका मुलाखतीत एका ओप्स मोमेंटला बळी पडावे लागले. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

'पुष्पा' हा ब्लॉकबस्टर चित्रपट सध्या जोरात सुरू आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. पुष्पाच्या यशानंतर सर्वजण रश्मिका मंदान्नावर कौतुकाचा वर्षाव करत असून तिला अनेक मोठ्या ऑफर्स आल्या आहेत. 

रश्मिका उप्स मोमेंटची शिकार

सोशल मीडियावर लोक रश्मिका मंदान्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एका लाइव्ह इव्हेंटमध्ये Oops मोमेंटची शिकार बनते. लाईव्ह इव्हेंटमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. संभाषणादरम्यान, ती तिच्या पायांची स्थिती बदलते आणि तिला स्वत:ला अवघडल्यासारखं होतं. 

या आउटफिटमध्ये रश्मिका मंदान्ना खूपच सुंदर दिसत असली तरी तिचे इनरवेअर पायांची स्थिती बदलताच कॅमेऱ्यासमोर दिसू लागले आणि जेव्हा हे फोटो व्हायरल झाले तेव्हा रश्मिकालाच अवघडल्यासारखे वाटले. या फोटोबाबत रश्मिकाचे कोणतेही वक्तव्य समोर आले नाही.

रश्मिकाचे वर्कफ्रंट

रश्मिका मंदान्नाने तिच्या करिअरची सुरुवात 2016 मध्ये कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'मधून केली होती. यानंतर, तिने 2018 साली 'चलो' या चित्रपटाद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये अभिनेता नागा शौर्य होता. याशिवाय बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या 'डियर कॉम्रेड' चित्रपटात रश्मिका विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसली होती. जी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली.

24 वर्षीय रश्मिकाने 'गीथा गोविंदम' या रोमकॉम चित्रपटात काम केले, जो तेलुगु चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. रश्मिका मंदान्ना लवकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियारश्मिका मंदानासेलिब्रिटीट्रोल