आपल्या कातडीचे जोडे करून पायात घातले तरी आई- वडिलांचं ऋण आपण फेडू शकत नाही, असं आपल्याकडचं प्रचलित वाक्य. हे वाक्य प्रमाण मानून एका सुपूत्राने खरोखरच त्याच्या कातडीच्या चपला तयार केल्या आणि आईच्या पायात घातल्या. ही गोष्ट आहे उज्जैन शहरात राहणाऱ्या आणि काही महिन्यांपुर्वी कुख्यात असणाऱ्या रौनक गुर्जर या व्यक्तीची. काही महिन्यांपुर्वीपर्यंत रौनक गुंडगिरी करणारा व्यक्ती म्हणून त्या परिसरात ओळखला जायचा. आता मात्र तो वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. त्याची गोष्ट व्हायरल आहे. (Raunak Gurjar from Ujjain presented an unusual gift of footwear crafted from his own skin to his mother)
aajtak.in यांनी दिलेल्या वृत्तानुसार रौनक आध्यात्मिक मार्गाला लागला आहे. आपण वाट्टेल ते केले तरी आईवडिलांचे ऋण फेडू शकत नाही असं त्याला वाटलं आणि त्यानं एक वेगळं पाऊल उचललं.
डाळिंब पिकलेलं, गोड, रसरशीत आहे हे न चिरता कसं ओळखायचं? २ सोप्या टिप्स- करा परफेक्ट खरेदी
त्याने घरातल्या कोणालाही न सांगता इस्पितळ गाठले आणि डॉक्टरांच्या मदतीने जांघेजवळील कातडी काढली. ती कातडी वापरुन त्यानं आईसाठी चपला बनवून घेतल्या.
१४ ते २१ मार्च या काळात त्याच्या घरी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यातच त्याने त्याच्या आईची पुजा करून तिच्या पायात स्वत:च्या कातडीचे जोडे घातले. या गोष्टीची चर्चा आता पंचक्रोशीतच नाही तर देशभर होत आहे.
होळीला पुरणपोळीच्या जोडीला पाहिजेच आंबट- गोड चवीची कटाची आमटी, बघा खमंग रेसिपी
त्यावरुन वादही होत आहेत आणि चर्चाही की आईवरील प्रेम दाखवण्यासाठी असे टोकाचे पाऊल उचलावे का?
आणि त्यानं जे केलं ते योग्य का?
चर्चा आहे म्हणून तर त्याची गोष्ट व्हायरल आहे.