Join us  

Raveena Tandon : 'लोकलमध्ये माझी छेड काढली अन्..,शारीरिक शोषणाबाबत रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 4:30 PM

Raveena Tandon : काही यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली, त्यानंतर रवीनानेही ट्रोलर्सना खडेबोल सुनावले 

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फिल्म अपडेट्ससोबतच ती अनेकदा सामाजिक विषयांवरही आपले मत मांडताना दिसते. पुन्हा एकदा रवीना टंडन तिच्या रोखठोक विधानामुळे चर्चेत आली आली. तिने तिच्या किशोरवयातल्या संघर्षमय दिवसांचा उल्लेख केला, जेव्हा ती लोकल ट्रेन आणि बसने प्रवास करायची. रवीनाने सांगितले की, 'यादरम्यान ती अनेक अनोळखी व्यक्तींकडून विनयभंगाची शिकार झाली आहे. खरंतर रवीनाने हे सगळं 'आरे मेट्रो 3 कारशेड'  (Aarey metro car shed) प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उघड झालं आहे. यानंतर काही यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली, त्यानंतर रवीनानेही ट्रोलर्सना खडेबोल सुनावले. (Raveena tandon revelas she was eve teased physically harassed in mumbai local during teenage)

आजकाल महाराष्ट्र सतत चर्चेत असतो. कधी राजकीय उलथापालथीमुळे तर कधी तेथे सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबाबत. आता 'आरे मेट्रो 3 कारशेडचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. खरे तर ते बनवायचे असेल तर आरेचे जंगल तोडावे लागेल, ज्याच्या विरोधात सर्वसामान्य जनता आणि राजकारणीच नाही तर सिनेतारकही पुढे येत आहेत. अभिनेत्री रवीना टंडन देखील त्यापैकी एक आहे.

खरं तर, रवीना टंडन निसर्गप्रेमी आहे. ती नेहमीच पर्यावरणासाठी आवाज उठवताना दिसते. 'मेट्रो 3 कारशेड'मुळे जंगलांचे नुकसान होऊ नये, अशी तिची इच्छा आहे. अलीकडेच एका यूजरने रवीना टंडनला मुंबईच्या मध्यमवर्गीयांच्या संघर्षाबद्दल विचारले तेव्हा रवीनाला तिचे किशोरवयीन दिवस आठवले. आपले दु:ख व्यक्त करताना त्यांनी ट्विट केले की, 'किशोरवयात लोकल ट्रेन आणि बसने प्रवास केला. छेडछाड, विनयभंग आणि  माझ्यासोबत जे काही घडले ते बहुतेक महिलांना जाणवते. मी पहिली कार 1992 मध्ये खरेदी केली. विकासासाठी आपले स्वागतच आहे. परंतु, केवळ एका प्रकल्पासाठी आपण जबाबदार नाही, तर पर्यावरण/वन्यजीवांचे संरक्षण करण्याऐवजी आपण तोडत असलेल्या सर्व जंगलांसाठी आपण जबाबदार असले पाहिजे.'

यावर दुसऱ्या युजरने रवीना टंडनला विचारले की, 'ती मेट्रोच्या विरोधात असलेल्या लोकल ट्रेनमध्ये शेवटचा प्रवास कधी केला? यावर रवीनाने पुन्हा एकदा तिच्यासोबत झालेल्या शारीरिक शोषणाचा खुलासा केला. तिनं लिहिले की, '1991 पर्यंत मी असा प्रवास केला आणि एक मुलगी असल्याने तुमच्यासारख्या अज्ञात ट्रोलर्सकडून माझा शारीरिक छळ झाला. नंतर मी माझी पहिली कार विकत घेतली. तुम्ही नागपूरचे आहात, तुमचे शहर हिरवेगार आहे. कोणाच्याही यशाचा किंवा कमाईचा विचार अशाप्रकारे करू नका.' या शब्दात  रवीनानं ट्रोलर्सची कानउघडणी केली आहे. सोशल मीडियावर रवीनाचे हे ट्विट व्हायरल होत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीरवीना टंडनसोशल व्हायरलबॉलिवूड