Lokmat Sakhi >Social Viral > डान्सचे रिल्स बनवायचे म्हणून छतावर पोहोचली पण अचानक वीज कडाडली आणि.. पाहा व्हायरल व्हिडिओ

डान्सचे रिल्स बनवायचे म्हणून छतावर पोहोचली पण अचानक वीज कडाडली आणि.. पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Dance Video Nature Thunder रिल्ससाठी म्हणून वाट्टेल ते प्रयोग केले जातात इथं मात्र निसर्गानंच छोटी गंमत केलेली दिसते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2022 01:29 PM2022-11-07T13:29:17+5:302022-11-07T13:31:14+5:30

Viral Dance Video Nature Thunder रिल्ससाठी म्हणून वाट्टेल ते प्रयोग केले जातात इथं मात्र निसर्गानंच छोटी गंमत केलेली दिसते.

Reached the roof to make dance reels but suddenly the thunderstorm started.. Watch viral video | डान्सचे रिल्स बनवायचे म्हणून छतावर पोहोचली पण अचानक वीज कडाडली आणि.. पाहा व्हायरल व्हिडिओ

डान्सचे रिल्स बनवायचे म्हणून छतावर पोहोचली पण अचानक वीज कडाडली आणि.. पाहा व्हायरल व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर रिल्सचाच बोलबाला आहे. अनेक भन्नाट रिल्स व्हायरल झालेले दिसतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही शिकवण देणारे. काही डान्स व्हिडिओ तर काही लोकांना खळखळून हसवणारे असतात. पण सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो काहीसा वेगळा आहे. हा व्हिडिओ एका मुलीच्या डान्सचा आहे असंच म्हणावं लागेल. ही तरुणी नाचण्यासाठी घराच्या छतावर पोहोचली, मात्र त्यानंतर जे काही घडलं, ते पाहून हसून पुरेवाट होईल.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी पावसाळ्यात घराच्या छतावर व्हिडिओ शूट करण्यासाठी जाते. तिने आधीच तिथे कॅमेरा बसवला आणि मध्यभागी जाऊन डान्ससाठी उभी राहते. गाणं सुरू होताच ती डान्स सुरू करते. पण नेमकं त्याच वेळी असं काही घडतं ते पाहून ती हादरून जाते. तिने तिचा डान्स सुरू करताच अचानक आकाशात ढगांचा जोरात गडगडाट होतो. मुलीने तिची पहिलीच डान्स स्टेप केली तिक्यात आकाशात वीजही कडाडते. हे पाहून ती मुलगी घाबरून जाते आणि आहे त्या जागी धाडकन पडते. हे दृश्य पाहून घाबरलेली मुलगी जमिनीवर तशीच पडून राहते.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर beautiful new_pix नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
अनेकांना हा व्हिडिओ आवडलाही आहे. मात्र डान्ससाठी आणि रिल्ससाठी करण्यात येणारे स्टंट अनेकदा अंगाशी येतात, त्यातलाच हा जरा विनोदी प्रकार आहे.

Web Title: Reached the roof to make dance reels but suddenly the thunderstorm started.. Watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.