आपल्या पाळीव प्राण्यांवर लोकांचं जिवापाड प्रेम असतं. माणूस माणसावर जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम माणूस आपल्या पाळीव प्राण्यावर करत असतो. मग तो कुत्रा असू देत की मांजर किंवा आणखी काही. अर्थात या प्रेमाची परतफेड हे प्राणी देखील दुप्पटीनं करत असतात. आपल्या मालकाशी खेळणं, त्यांचा जीव रमवणं ते वेळ पडल्यास आपला जीव धोक्यात घालून मालकाचा जीव वाचवणारी प्राणीव प्राण्यांची कितीतरी जिवंत उदाहरणं आहेत. त्यांच्यातील कौशल्यांनी त्यांनी केवळ आपल्या मालकाचेच नाही तर इतरांचीही मनं जिंकली आहेत. कधी कधी प्राण्यांमधील कौशल्य पाहून हे त्यांना कसं जमलं असा कौतुकवजा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहात नाही. असंच कौतुक सध्या एका गोंडस कुत्र्याच्या वाट्याला येत आहे.
Image: Google
कुत्रे, मांजरं हे प्राणी पाळणं काही आताच सुरु झालं नाही. पण सोशल मीडियामुळे आपण पाळलेल्या प्राण्याचं कौतुक इतरांसोबत वाटून घेणं जमू लागलं आहे आणि प्राणी पाळत नसलेल्यांनाही पाळीव प्राणी किती जीव लावणारे असतात, किती हुशार असतात हे पाहून इतरांनाही आनंद घेणं शक्य होत आहे. हे सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यावर कौतुकाच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरु झाला. या व्हिडीओला सोशल मीडियावर 600 के व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हिडीओ अरुणिमा नावाच्या मुलीने आपल्या फेसफुक पेजवरुन शेअर केला. आपल्या आईच्या वाढदिवसाचा आनंद इतरांसोबत शेअर करणं हा उद्देश तर या व्हिडीओमागे होताच पण या व्हिडीओचा खरा हिरो होता, तो त्यांच्या घरातला पाळीव कुत्रा. आजूबाजूला काय चालू आहे, आपण त्याप्रसंगी कसं वागायला हवं हे आपल्यासारख्या माणसांना कळत असेल पण प्राण्यांना कुठून कळणार? पण हाच समज हा व्हिडीओ पाहिला की दूर होतो.
Image: Google
अरुणिमाच्या आईच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होतं. आईनं केकवा लावलेल्या मेणबत्त्या विझवल्या आणि केक कापायला सुरुवात केली. सर्वजण टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे म्हणत अरुणिमाच्या आईवर शुभेच्छांचा वर्षाव करु लागलं. आपल्याला वाटतं व्हिडीओ फक्त वाढदिवस सेलिब्रेशनचाच आहे. पण तितक्यात कॅमेरा कोपर्यातल्या कुत्र्याकडे फिरतो. इतर सगळ्यांसारखा कुत्रा देखील वाढदिवस सेलिब्रेशनसाठी उभा होता. सगळे टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे म्हणू लागल्यावर हा कुत्रा मागच्या दोन पायावर उभा राहून पुढच्या दोन पायांनी आपला बॅलन्स सांभाळत टाळ्या वाजवू लागला. खरा व्हिडीओ कुत्र्याच्या या कृतीचा. आपल्या मालकाच्या वाढदिवसाचा आनंद कुत्राही किती सुंदर प्रकारे साजरा करु शकतो हे दाखवणारा हा क्षण या व्हिडीओत टिपला आणि अरुणिमानं फेसबुकवरुन तो व्हायरल केला.
Image: Google
प्राण्यांना बोलून भावना व्यक्त करता येत नसतील पण आपल्या देहबोलीतून या भावना ते वेळोवेळी व्यक्त करतात. आपलं मालकावरचं प्रेम दाखवून देतात. प्राण्यांच्या भावनांची कोणाला काय कदर? असाही एक समज असतो. पण ही कदर किती हे या व्हिडीओतून दिसतं. आपल्या लाडक्या कुत्र्यानं केलेली ही कृती बघून अरुणिमाच्या चेहर्यावरचा आनंदही लपला नाही. त्यादिवशी अरुणिमाच्या आईच्या वाढदिवसाचं सगळ्यात मोठं गिफ्ट हे त्यांच्या लाडक्या कुत्र्याकडून मिळालं होतं.
हा व्हिडीओ बघून कोण म्हणेल कुत्र्याला टाळ्या वाजवता येत नाही म्हणून? ही पोस्ट जशी व्हायरल झाली तशा कमेण्टस येणं सुरु झालं. किती हुशार कुत्रा, किती गोड कुत्रा असं म्हणून कुत्र्याला शाबासकी तर मिळालीच पण सोबतच किती छान शिकवलं कुत्र्याला असं म्हणत मालकाचं कौतुक करणार्या प्रतिक्रियाही या पोस्टवर आल्या. तर काहींनी चांगलं ट्रेनिंग दिल्याशिवाय कुत्र्याला हे कसं जमेल? असा कुतुहलमिश्रित प्रश्न उपस्थित केला.