Join us  

१ नंबर! २५ वर्ष जुनं घर रिसायकल करून बांधला इको फ्रेंडली बंगला; ना AC ची गरज, ना पुराची भिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 6:13 PM

Recycled Old House : ''माझे जुने घर होते त्याच जागेवर माझे नवीन घर बांधले आहे. कारण जुन्या घराशी माझे भावनिक नाते होते. ते माझे आई-वडील राहायचे ते ठिकाण होते आणि त्यांच्याशी खूप आठवणी जोडल्या गेल्या होत्या.'' 

(Image Credit- Thebetterindia.com)

गाव आणि गावचं घरचं म्हणजे सगळ्यांचाच जिव्हाळाचा विषय. आपल्या घराला नेहमीच सजवावं, फुलवावं सगळ्या सोयी घरात असाव्यात असं प्रत्येकाला वाटतं. शहरी भागात शक्य झालं नाही तर गावात काहीजण आपल्या मनाप्रमाणं आलिशान घर बांधून घेतात आणि सुट्टीच्या दिवसात कुटुंबियांसह या घरात छान वेळ घालवतात. अशाच एका दक्षिण भारतीय कुटुंबाबद्दल आणि त्यांनी बांधलेल्या घराबद्दल या लेखाच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. (Recycled old house built flood proof house ac is not required)

वास्तविक २०१८ च्या भीषण पुराने दक्षिणेकडील राज्याच्या विविध भागांना प्रभावित केले तेव्हा, एलूर हे अशा क्षेत्रांपैकी एक होते ज्याला पूराचा मोठा फटका बसला होता. परिसरातील बहुतांश घरे पाण्यात बुडाली. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पुरूषन नावाचे रहिवासी एलूरच्या घरातच लहानाचे मोठे झाले. यावेळी त्यांच्याशी घराचं फार नुकसान झालं, बरंच सामान वाहून गेलं.  (Can houses be built from recycled materials)

 द बेटर इंडियाशी बोलताना पुरूषन म्हणाले की, ''या घटनेनंतर मी फ्लडप्रूफ असे टिकाऊ घर बांधण्याचा विचार केला.  महापुरात  घरातील सर्व सामानाची नासधूस झाली. पण मला सगळ्यात जास्त काळजी वाटली ती म्हणजे पेरियार नदीच्या प्रदूषणासंबंधी मी जमवलेले सर्व अभिलेख आणि दस्तऐवज पुरामुळे नष्ट झाले होते. भविष्यात असं कधीही कुठेच घडू नये असं मला वाटतं.''

कार्बन फूटप्रिंट कमी करण्याबरोबरच पुराचा धोका नसलेले शाश्वत घर बांधण्याचा विचार पुरुषन यांनी केला. हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या जुन्या काँक्रीटच्या घराचा पुनर्वापर करून ३६ लाख रुपये खर्चून आपले वेगळे निवासस्थान बनवले.  ते स्वत: बांधकाम क्षेत्राशी निगडीत होते आणि त्यांना नेहमीच पर्यावरणपूरक गोष्टी आणि पद्धतींमध्ये रस होता. त्याचं घरही असंच काहीसं असावं असं त्याला वाटत होतं. पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मला समाजासमोर एक आदर्श ठेवायचा होता, असे ते म्हणतात

(Image Credit- The better india)

या घराची रचना वास्तुविशारद गंगा दिलीप यांनी केली होती. त्यांनी गंगा दिलीपसोबत अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. गंगा सांगतात की, ''लोकांमध्ये अनेकदा असा गैरसमज असतो की पर्यायी बांधकाम पद्धतींचा अवलंब करून तुम्हाला तुमच्या इच्छांशी तडजोड करावी लागेल. पण हे घर ही धारणा चुकीची असल्याचं सिद्ध करते. हे घर बांधण्यासाठी कोणतीही तडजोड केलेली नाही''

घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं

या 3000 चौरस फूट घराचे वैशिष्ट्य .त्याची अनोखी रचना  ज्याला 'रूम फॉर द रिव्हर' असेही म्हटले जाते.  पुराच्या वेळी इमारतींचे संरक्षण करण्यासाठी ही डच-प्रेरित डिझाइन योजना आहे.  यात अंतर्गत तळ मजल्यावर उंच बनवलेल्या खांबांवर घर बांधले जाते आणि तळमजला रिकामा ठेवला जातो.

2018 मध्ये जेव्हा  पूर आला होता तेव्हा घरात 8.5 फुटांपर्यंत पाणी होते, त्यामुळे पुरूषन त्यांनी पहिला मजला 10 फूट उंच करण्याचा निर्णय घेतला. आता पूर आला तरी खालून पाणी सहज वाहून जाऊ शकते आणि म्हणूनच या संकल्पनेला 'रूम फॉर द रिव्हर' असे म्हणतात. पुरुषन म्हणतात, ''माझे जुने घर होते त्याच जागेवर माझे नवीन घर बांधले आहे. कारण जुन्या घराशी माझे भावनिक नाते होते. ते माझे आई-वडील राहायचे ते ठिकाण होते आणि त्यांच्याशी खूप आठवणी जोडल्या गेल्या होत्या.'' 

नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल

घरातील काँक्रीटचा ढिगारा, विटा, बाथरूमच्या फरशा आणि अगदी कपाटे यांचा पहिल्या मजल्यापर्यंत पुनर्वापर करण्यात आला. पहिल्या मजल्यावर व्हिजिटिंग रूम, डायनिंग स्पेस, मास्टर बेडरूम आणि ओपन किचन बांधण्यात आले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलकेरळ