भटक्या कुत्र्यांचा (Stray Dogs) वावर सर्वत्र असतो. काही दिलदार लोक त्यांना खाऊ घालतात, तर काही कुत्री स्वतःचं अन्न स्वतः शोधत आपआपली वाट पकडतात. काही कुत्री जेवणाच्या शोधात सोसायटी किंवा चाळीत जाऊन पोहचतात. चाळ किंवा सोसायटी बाहेर आपण पहिलंच असेल की, तिकडे पारदर्शक बॉटलमध्ये लाल किंवा निळ्या रंगाचे पाणी भरून लटकवली जाते. या पाण्याला पाहून कुत्री घाबरतात, असे म्हटले जाते (Social Viral).
पण यात तथ्य किती? लाल रंगाचे पाणी पाहून खरंच कुत्री घाबरतात का? यामुळे कुत्री भुंकणे किंवा त्यांचा सोसायटी बाहेर असलेला वावर कमी होतो का? पाहूयात(Red liquid a day keeps stray dogs at bay).
जंगली आणि शहरातील कुत्र्यांच्या डोळ्यातील अंतर
इटलीतील बारी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी, कुत्र्यांचे डोळे तपासण्याची नवी पद्धत विकसित केली आहे. काही कुत्र्यांना लाल आणि हिरवा रंग ओळखण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे भटके कुत्री दिवसा कमी रात्रीच्या वेळेस त्यांचा वावर जास्त वाढतो. शहरी भागातील लोकांच्या वर्दळीमुळे कुत्र्यांना एकाच जागी राहणं कठीण होऊन जाते. त्यामुळे ते दिवसभर फिरत असतात.
कुत्र्यांना लाल-निळ्या रंगाची भीती का वाटते?
यासंदर्भात, बारी विद्यापीठाचे मार्सेल सिनसिंची सांगतात, 'कुत्र्यांना लाल किंवा निळा रंग दिसत नाही. असं नाही की, या रंगाचे वस्तू, त्यांच्या डोळ्यांसमोरून गायब होतात. मात्र, त्या वस्तूच्या मागे काय आहे ते कुत्र्यांना दिसते. कलर ब्लाइंडनेसमुळे कुत्र्यांना लाल आणि निळा रंग पाहण्यात त्रास होतो. त्यामुळे ते लाल किंवा निळ्या रंगाची वस्तू दिसताच तेथून पळ काढतात.
कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय? यामुळे डोळ्यांमध्ये कोणते बदल होतात?
रंगांधळेपणा म्हणजे रंग स्वतंत्रपणे ओळखण्यात येणारी अडचण. यामध्ये काहींना विशिष्ट रंग ओळखण्यात त्रास होतो. विशेषत: लाल, हिरवा आणि कधीकधी निळा रंग, ओळखण्यात त्यांची तारांबळ उडते. यामुळे कुत्र्यांना लाल किंवा निळा रंग ओळखण्यात अडचण येते. प्राण्यांच्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये दोन प्रकारच्या पेशी आढळतात. शंकू आणि शलाका पेशी. शंकू पेशी असलेल्यांना उजेडात सर्वकाही दिसते. पण शलाका पेशी असणाऱ्यांना मंद प्रकाशात दिसण्यात अडचण निर्माण होत नाही.
मानवी डोळ्यांमध्ये शंकू पेशी जास्त प्रमाणात असते. तर, रॉड्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे अंधारात आपल्याला दिसण्यात अडचण येते. तर कुत्र्यांमध्ये शंकू कमी प्रमाणात आणि रॉड जास्त प्रमाणात आढळतात. या कारणास्तव कुत्र्यांचा वावर हा रात्री असतो.