उन्हाळा सुरु झाला की, तापमानात वाढ होते. घसा अगदी कोरडा पडू लागतो, डिहायड्रेशनची समस्या सतावते.(Best earthen pot for summer) मार्च- एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा इतका वाढतो की आपल्याला टेन्शन येऊ लागते.(Red vs black clay pot) उकाड्यामुळे जीव नकोसा होतो. सतत थंड काही तरी प्यावेसे वाटते. अशावेळी आपण ज्यूस किंवा पाणी पितो. परंतु, पाणी थंडगार नसेल तर आपली तहान काही जात नाही. (Clay pot for cold water)
उन्हाळ्यात बाजारात आपल्या सर्वत्र मातीची भांडी पाहायला मिळतात. पाणी थंडगार राहण्यासाठी फ्रीजऐवजी आपण मातीचा माठ खरेदी करतो.(Summer kitchen hacks) बदलत्या काळानुसार थंड पाण्यासाठी वॉटर कूलर, रेफ्रिजरेटरसारखी उत्पादने बाजारात असली तरी माठ अजूनही वापरले जातात. (Which clay pot keeps water coldest in summer) विजेचे बिल जास्त प्रमाणात येऊ नये यासाठी अगदी गाव खेड्यापासून शहरात मातीच्या माठाची मागणी अधिक प्रमाणात असते. अनेकदा मातीचे माठ खरेदी करताना आपला गोंधळ उडतो.(Tips for buying the best clay water pot) लाल की काळा कोणत्या रंगाचा माठ खरेदी करायला हवा. जर आपल्याला देखील असा प्रश्न पडला असेल तर या ५ टिप्स लक्षात ठेवा. (Clay pot kitchen hacks for summer)
उन्हाळ्यात १५ दिवस ताजी आणि हिरवीगार राहील कोथिंबीर, पाहा १ खास ट्रिक
1. कोणत्या रंगाचा माठ खरेदी करावा?
काळा रंग हा उष्णता लवकर शोषून घेतो, त्यामुळे काळ्या भांड्यातील पाणी लवकर थंड होते. तसेच ते पाणी शरीरासाठी देखील चांगले असते. उन्हाळ्यात काळ्या रंगाच्या माठाला मोठी मागणी असते. लाल माठ हा चांगला असला तरी त्यातील पाणी जास्त वेळ गार राहात नाही. सध्या मातीचे माठ खरेदी करताना त्यामध्ये सिमेंटची भेसळ केली जाते, त्यामुळे माठ खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी.
2. भेसळयुक्त माठ कसा ओळखावा?
माठ खरेदी करताना त्याचे वजन पाहायला हवे. मातीची भांडी ही वजनाला हलकी असतात आणि सिमेंटची भांडी जड असतात. सिमेंट मिसळलेल्या भांड्यातील पाणी मातीच्या भांड्यातील पाणी इतके स्वच्छ आणि चांगले नसते.
उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही
3. माठ निवडताना...
माठ खरेदी करताना तो जाड आहे की, नाही हे तपासा. माठातील पाणी बराच वेळ थंड राहाते. पातळ असलेला मातीचा माठ हा लगेच फुटण्याची शक्यता असते. माठ खरेदी करताना त्याच्या जाडीकडे लक्ष द्यायला हवे.
4. माठ गळतीची चाचणी
अनेकदा घाईत माठ खरेदी करताना गळका किंवा त्याला छिद्र आहे की नाही हे तपासायला आपण विसरतो. नंतर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. त्यासाठी माठात पाणी घालून तपासून घ्या.
5. या गोष्टी लक्षात ठेवा
अनेकदा माठाची डिझाइन किंवा त्याच्या युनिक पद्धतीमुळे आपण तो लगेच खरेदी करतो. त्याच्या रंगामुळे पाणी जास्त थंड होत नाही. नळ असलेला माठ थोडा मोठा खरेदी करावा. यामुळे आपल्याला त्यात पाणी सतत भरावे लागणार नाही. तसेच पाणी शुद्ध आणि थंड राहिल.