Join us  

झणझणीत मिरची नाकाला लावणं तरुणीला पडलं महागात! मेंदूला आली सूज - गेली कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 7:17 PM

Red snot chilli pepper: Woman in Brazil fell into coma after SNIFFING super-hot chilli caused deadly allergic reaction मिरचीचा वास घेतल्यानं कुणी कोमात जाऊ शकतं यावर विश्वास ठेवाल तुम्ही? पण एक तरुणीचं असं झालं, तिला निघाला भलताच आजार

'हाय हाय मिरची - उह उह मिरची' हे गाणं आपण ऐकलंच असेल. मिरची खाल्ल्यानंतरची अवस्था खरंतर प्रत्येकाची अशीच होते. भारतीयांना मिरचीशिवाय जमत नाही. पदार्थात थोडं तिखट कमी पडलं तर, आपण बेचव म्हणून पदार्थ खाणं टाळतो. जोपर्यंत आपण झणझणीत काहीतरी खात नाही, तोपर्यंत जिभेला शांती, आणि भूक मिटत नाही. परंतु परदेशातील लोकं तेथील वातावरणानुसार कमी तिखटाचे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. मात्र, एका महिलेला मिरचीचा वास घेणं महागात पडलं आहे.

थाईस मेडीरोस या ब्राझिलियन महिलेने गमतीत मिरचीचा वास घेतला, व यामुळे तिचा जीव धोक्यात आला आहे. थाईस गेल्या ६ महिन्यांपासून रुग्णालयात प्रकृतीने त्रस्त असून, तिच्या मेंदूला सूज आली आहे(Red snot chilli pepper: Woman in Brazil fell into coma after SNIFFING super-hot chilli caused deadly allergic reaction).

नेमकं प्रकरण काय?

अॅनापोलिसस्थित २५ वर्षीय थाईससोबत एक विचित्र घटना घडली. एके दिवशी ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत घरी जेवण बनवत होती. जेवण बनवत असताना तिला मिरच्यांचा वास आला. मिरची खूप मसालेदार होती. तिने गंमत म्हणून वास घेण्याचा प्रयत्न केला. तिने मिरची नाकाला लावली. मात्र, वास इतका तीव्र होता की, ती आजारीच पडली. यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडली. आधी तिच्या घशाला खाज सुटू लागली, त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्रास हळू हळू खूपच वाढत गेला, तिला त्वरित दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

फ्रिजच्या डोअरवर रबर कळकट - चिकट झालाय, घाण साचली? ३ टिप्स, काही मिनिटांत फ्रिज चकाचक

तिथे तपासणी केली असता, तिच्या मेंदूला तिखट मिरचीच्या तीव्र वासामुळे सूज आल्याचं समोर आलं. ज्याला एडीमा असं म्हटलं जातं. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, थाईसला मिरचीची ऍलर्जी होती. या कारणामुळे ती अनेक दिवस कोमातही गेली होती.

प्रेशर कुकर वापरताना विसरु नका ४ गोष्टी, चुकलं तर होईल कुकरचा स्फोट-जीवाला धोका

यासंदर्भात, तिची आई, अॅड्रियाना म्हणते, 'माझ्या मुलीला आधीच ब्राँकायटिस आणि दमा यासह अनेक आजार आहेत. अशा स्थितीत तिच्या मेंदूलाही सूज निर्माण झाली. ३१ जुलै रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले होते. मात्र, ४ दिवसानंतर थाईसला ताप आणि लाल लघवीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'

टॅग्स :ब्राझीलसोशल मीडियासोशल व्हायरल