'हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी मे...' या ओळी काही जणांच्या बाबतीत अगदीच खऱ्या आहेत. त्यांना प्रेम नेहमीच चकवा देतं. असंच काहीसं अभिनेत्री रेखा यांच्या बाबतीतही आहेच.. खरं तर त्या एक उत्तम अभिनेत्री. सौंदर्य, यश हे सगळंच त्यांना लाभलं. त्या जोरावर खरं प्रेम त्यांच्या वाट्याला येणं काहीच अवघड नव्हतं. पण म्हणतात ना 'कभी किसी को मुकंमल जहा नहीं मिलता' असं काहीसं त्यांच्या बाबतीत झालं. रेखा यांची प्रेमकहानी बॉलीवूडमधली नेहमीच एक अधूरी प्रेम कहानी म्हणून ओळखली गेली. खरं प्रेम, नवरा, मुलं, संसार या बाबतीत रेखा यांनी अनेक स्वप्नं पाहिली होती. वाचा त्या स्वप्नांविषयीच रेखा यांनी सांगितलेली एक खास गोष्ट..(Actress Rekha Revealed About Her Dreams)
१० ऑक्टोबर रोजी रेखा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये रेखा यांना असं विचारण्यात आलं होतं की किशोरवयीन असताना रेखा यांचं काय स्वप्न होतं..
तुटलेलं क्लचर लगेच फेकून देता? २ पद्धतींनी वापरून पाहा, बघा कसा करावा भन्नाट वापर...
त्या प्रश्नाचं उत्तर देताना रेखा म्हणतात की तेव्हा आपण अभिनेत्री व्हावं, हे स्वप्न त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. उलट त्यांनी तर असं स्वप्न पाहिलं होतं की त्यांच्यावर मनापासून खूप प्रेम करणाऱ्या, त्यांची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचं लग्न व्हावं, त्यांचा छान संसार असावा, भरपूर मुलं व्हावं आणि असा छानसा सुखाचा संसार व्हावा.. रेखा म्हणतात मी त्याकाळी अशी स्वप्नं का बघायचे, याचं मला आता आश्चर्य वाटतं. पण काय करू तेव्हा माझी स्वप्नं ही अशीच होती..
दुर्दैवाने रेखा यांची तीच स्वप्नं पूर्ण होऊ शकली नाही. काही वर्षांपुर्वी एका मुलाखतीत त्यांनी असंही सांगितलं होतं की जर त्यांना हवा तसा जोडीदार मिळाला असता तर त्यांनी सगळं लक्ष फक्त त्याच्यावरच केंद्रित केलं असतं. त्याचे कपडे, त्याचं खाणं- पिणं असं सगळं स्वत:च ठरवलं असतं.
साधी हळद वापरण्यापेक्षा 'या' पद्धतीने वापरा! चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा सोनेरी ग्लो येईल...
एवढंच नाही तर स्वत:च्या हाताने जेवण तयार करून त्याला वाढलं असतं...१९९० साली रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मुकेश यांनी आत्महत्या केली. त्यानंतर पुढे कित्येक वर्ष रेखा यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नव्हता..