Lokmat Sakhi >Social Viral > मैने प्यार किया आठवतो? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला खास व्हिडिओ; आठवेल नक्की, दिल दिवाना बिन सजना के..

मैने प्यार किया आठवतो? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला खास व्हिडिओ; आठवेल नक्की, दिल दिवाना बिन सजना के..

Maine Pyaar Kiya मैने प्यार किया सिनेमा प्रदर्शित होऊन ३३ वर्षे पूर्ण झाली पण असं काय आहे जे त्या सिनेमात खास आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2022 04:23 PM2022-12-30T16:23:28+5:302022-12-30T16:24:50+5:30

Maine Pyaar Kiya मैने प्यार किया सिनेमा प्रदर्शित होऊन ३३ वर्षे पूर्ण झाली पण असं काय आहे जे त्या सिनेमात खास आहे..

Remember Maine Pyaar Kiya? Actress Bhagyashree shared a special video; Will definitely remember, Dil Deewana Bin Sajna Ke.. | मैने प्यार किया आठवतो? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला खास व्हिडिओ; आठवेल नक्की, दिल दिवाना बिन सजना के..

मैने प्यार किया आठवतो? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला खास व्हिडिओ; आठवेल नक्की, दिल दिवाना बिन सजना के..

"मैने प्यार किया" या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आजही तितकीच यंग आणि सुंदर दिसते. या चित्रपटाने त्या वेळचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. भाईजान सलमान खान आणि भाग्यश्री या जोडीची जादू बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालली. आता नुकतंच या चित्रपटाला ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाग्यश्री यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

२९ डिसेंबर १९८९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सलमान आणि भाग्यश्री व्यतिरिक्त या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील गाणी हे सगळंच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची क्रेझ आजही तितकीच चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. याचाच अनुभव देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाग्यश्री यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लहान मुलांचा एक व्हिडीओ शेअर केला. यात ती लहान मुलं ‘मैने प्यार किया’ चित्रपटातलं अत्यंत गाजलेलं ‘दिल दिवाना’ हे गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत भाग्यश्रीने लिहिलं, “‘मैने प्यार किया’ प्रदर्शित होऊन ३३ वर्षांनीही या चित्रपटाला इतकं भरभरून प्रेम मिळत आहे, माझ्यासाठी आजही तुमच्या हृदयात वेगळं स्थान आहे यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. सलमान खान, राजश्री फिल्म्स, सुरजजी आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमशिवाय हे शक्य झालं नसतं. आपल्या सगळ्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे.”

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Web Title: Remember Maine Pyaar Kiya? Actress Bhagyashree shared a special video; Will definitely remember, Dil Deewana Bin Sajna Ke..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.