Lokmat Sakhi >Social Viral > चीनने बनवले किस करण्याचे मशिन, दूर-दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी रोमॅण्टिक उपकरण! रोमान्स ऑनलाइन..

चीनने बनवले किस करण्याचे मशिन, दूर-दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी रोमॅण्टिक उपकरण! रोमान्स ऑनलाइन..

Remote Kissing Device By China : दूर राहणाऱ्या पार्टनरलाही किस करणे शक्य, पाहा कसे आहे किसिंग डिव्हाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2023 05:41 PM2023-02-26T17:41:13+5:302023-02-27T19:25:39+5:30

Remote Kissing Device By China : दूर राहणाऱ्या पार्टनरलाही किस करणे शक्य, पाहा कसे आहे किसिंग डिव्हाईस

Remote Kissing Device By China : Kissing machine? A fancy device made in China for estranged partners... Matter of romance | चीनने बनवले किस करण्याचे मशिन, दूर-दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी रोमॅण्टिक उपकरण! रोमान्स ऑनलाइन..

चीनने बनवले किस करण्याचे मशिन, दूर-दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी रोमॅण्टिक उपकरण! रोमान्स ऑनलाइन..

आपले प्रेम असणाऱ्या व्यक्तीची किस घेणे किंवा किस देणे ही प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर भाषा आहे. यामुळे आपले त्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमाची पावती आपण एकप्रकारे देत असतो. एकमेकांच्या सोबत असताना किस करणे शक्य असते पण एकमेकांपासून लांब असलेल्यांना हे सुख अनुभवता येत नाही. आता आपण ज्या व्यक्तीशी रीलेशनशिपमध्ये असू ती आपल्या जवळ असेलच असे नाही. अनेकदा शिक्षण, नोकरी किंवा अन्य काही कारणांनी आपला जोडीदार आपल्यापासून दूर असण्याची शक्यता असते (Remote Kissing Device By China). 

(Image : Google)
(Image : Google)

अशावेळी जोडीदाराची किस घ्यायची इच्छा होऊनही आपण ती पूर्ण करु शकत नाही. हाच विचार करुन चीनने एका अनोख्या उपकरणाची निर्मिती केली आहे. एकमेकांपासून दूर असलेले जोडीदार या उपकरणाद्वारे किस करु शकणार आहेत. यामुळे दूर असलेल्या जोडीदाराशी काही प्रमाणात का होईना रोमान्स कऱणे शक्य होणार आहे. दुसऱ्या गावात, राज्यात अगदी देशातही असलेल्या आपल्या प्रेमाच्या नात्यात त्यामुळे ओलावा येण्यास मदत होईल असं हे उपकरण तयार करणाऱ्यांचं म्हणणं आहे. 

अनेकदा आपण दूर असलेल्या आपल्या प्रेमिका किंवा प्रियकराशी फोनद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतो. या दरम्यान आपल्याला समोरच्याला प्रेमाने किस करण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण चक्क फोनला ओठ लावून पापी घेतो पण समोरच्याला त्याचा फिल येत नाही. हेच लक्षात घेऊन प्रत्यक्ष फिल देणारे हे उपकरण तयार करण्यात आले आहे. सिलिकॉनचे ओठ असलेल्या या उपकरणाला सेन्सर देण्यात आला आहे.

(Image : Google)
(Image : Google)

उपकरण कसं काम करणार? 

हे उपकरण ब्लूटूथ आणि अॅपद्वारे फोनशी लिंक केले जाईल. मोबाईल फोनमध्ये प्लगईन केल्यावर हे उपकरण कार्य करू शकते. दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईसला हे उपकरण कनेक्ट करता येऊ शकत नाही. हे उपकरण कंट्रोल करण्यासाठी रिमोट देण्यात आला असून त्याद्वारे आपल्याला ते हाताळता येणार आहे. जोडीदाराने क्लिक केल्यानंतर या डिव्हाईसचे व्हायब्रेशन होईल आणि समोरच्या व्यक्तीला किसिंगचा आनंद घेता येईल.


 

Web Title: Remote Kissing Device By China : Kissing machine? A fancy device made in China for estranged partners... Matter of romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.