Join us  

साडी नेसलेली महिला आणि तरुणाने केला जबरदस्त स्टंट; व्हायरल व्हिडिओ, स्टंट असा खतरनाक की..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 3:18 PM

Saree clad woman aces difficult stunt viral video : १५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ती महिला साडी नेसून पुरुषाच्या मदतीने  अवघड स्टंट काढताना दिसत आहे.

साडी नेसून वर्कआऊट करण्याचा तसंच साडीवर डान्स, स्टंट करण्याचे अनेक व्हिडिओज तुम्ही आातापर्यंत पाहिले असतील. साडी नेसून स्टंट करण्याचाा व्हिडिओ  सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतका कठीण स्टंट साडी नेसून करताना तुम्ही कधीच पाहिला नसेल. (Saree clad woman aces difficult stunt viral video)  8 डिसेंबर रोजी @Gulzar_sahab या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. गुलजारसाहेब ट्विटर हँडलवर १९२ हजार फॉलोअर्स आहेत. (Report saree clad woman aces difficult stunt viral video leaves netizens spellbound)

१५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये ती महिला साडी नेसून पुरुषाच्या मदतीने  अवघड स्टंट काढताना दिसत आहे. क्लिपमध्‍ये टिपलेला स्टंट पाहून तुम्हीही हसू अनावर होईल. जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला प्रेरित केले तर अशक्य असे काहीच नाही, हे व्हिडिओमध्ये तंतोतंत दर्शविले आहे.

पोस्ट शेअर केल्यापासून 6,100 हून अधिक व्हिव्ह्ज मिळाले आहेत. याची संख्या अजूनही वाढत आहे. याव्यतिरिक्त, याने 360 पेक्षा जास्त लाईक्स आणि जवळपास 30 रिट्विट्स देखील मिळाले आहेत. कमेंट्स विभागात लोक या व्हिडिओवर हार्ट इमोज पाठवत आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया