Lokmat Sakhi >Social Viral > Restaurant bill from 1985 : ३७ वर्ष जुनं हॉटेलचं बील होतंय व्हायरल; शाही पनीर, दाल मखनीची किंमत वाचून व्हाल चकीत

Restaurant bill from 1985 : ३७ वर्ष जुनं हॉटेलचं बील होतंय व्हायरल; शाही पनीर, दाल मखनीची किंमत वाचून व्हाल चकीत

Restaurant bill from 1985 : यात शाही पनीर, दाल मखनी आणि रोटी ऑर्डर केली होती. या वस्तूंचे  रेटसुद्धा लिहिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:50 PM2022-11-21T13:50:33+5:302022-11-21T14:04:13+5:30

Restaurant bill from 1985 : यात शाही पनीर, दाल मखनी आणि रोटी ऑर्डर केली होती. या वस्तूंचे  रेटसुद्धा लिहिले होते.

Restaurant bill from 1985 price of shahi paneer and dal makhani was to low goes viral | Restaurant bill from 1985 : ३७ वर्ष जुनं हॉटेलचं बील होतंय व्हायरल; शाही पनीर, दाल मखनीची किंमत वाचून व्हाल चकीत

Restaurant bill from 1985 : ३७ वर्ष जुनं हॉटेलचं बील होतंय व्हायरल; शाही पनीर, दाल मखनीची किंमत वाचून व्हाल चकीत

विकेंडला किंवा रोजच्या रुटीनमधून ब्रेक म्हणून प्रत्येकजण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जातो. कधीतरीच बाहेर जेवणाऱ्या लोकांना हॉटेलच्या जेवणाची चव फारच आवडते.  सध्या सोशल मीडियावर हॉटेलच्या जेवणाच्या बीलाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो १९८५ चा आहे. यात या जेवणाची किंमत दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे बील १९८५ चं आहे.

यात शाही पनीर, दाल मखनी आणि रोटी ऑर्डर केली होती. या वस्तूंचे  रेटसुद्धा लिहिले होते.  (Restaurant bill from 1985 price of shahi paneer and dal makhani was to low goes viral)यात असं दिसून आलं की शाही पनीर फक्त ८ रुपयांना होतं तर मखनी आणि  रायता त्यावेळी फक्त ५ रूपयांना मिळायचा. इतकंच नाही तर रोटी फक्त ७० पैश्यांना होती.

एकूण जेवणाचं बिल फक्त २६ रूपये ३० पैसे झालं होतं. विशेष म्हणजे सर्विस टॅक्ससुद्धा नमूद केला आहे. याची रक्कम फक्त २ रूपये आहे. म्हणजे  हे एखाद्या चांगल्या हॉटेलचं बील असणार असं दिसून येतं. हे बील पाहून लोक अंदाज लावत आहे की त्यावेळी सगळ्याच खाण्याच्या वस्तू किती स्वस्त असतील.

हे बील व्हायरल होताच लोकांनी त्याची आजच्या किंमतीशी तुलना करायला सुरुवात केली. एकीकडे जिथे 1985 मध्ये शाही पनीरची किंमत 8 रुपये होती, तिथे आज त्याची किंमत २०० ते ३०० रूपयांनी वाढली आहे. वेगवेगळ्या हॉटेल्सच्या किंमती निश्चितपणे भिन्न असतात. पण ठराविक दिवसांनी त्या किमती वाढत असतात.  अनेकांनी हा फोटो पाहिल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Web Title: Restaurant bill from 1985 price of shahi paneer and dal makhani was to low goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.