कोण काय शक्कल लढवेल आणि त्याद्वारे स्वतःचा कसा नफा कमवून घेईल काही सांगता येत नाही. अशीच थायलंडच्या एका रेस्टॉरंटची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या रेस्टॉरंटने आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहकांनी यावं यासाठी एक भारीच जाहिरात केली आहे. जेवढं कमी वजन तेवढा जास्त डिस्काऊंट.. मग तुम्ही कितीही खाल्लं आणि कोणताही पदार्थ खाल्ला तरी चालेल.. अशी जाहिरात करून रेस्टॉरंट चालक ग्राहकांना आकर्षित करत आहेत.(Viral Story Of A Restaurant Offering Discount As Per Weight)
पण नुसतं एवढं सांगून रेस्टॉरंट चालक थांबलेले नाहीत. त्यांनी आणखी एक वेगळा नियम ठेवला आहे. तो नियम म्हणजे तुम्हाला तुमच्या वजनानुसार जर डिस्काऊंट पाहिजे असेल तर त्यासाठी ग्राहकांना एक चॅलेंज पूर्ण करावं लागणार आहे.
पातळ केस काही दिवसांतच भरभर वाढून होतील दाट! 'हे' घरगुती तेल लावा, केस गळणंही थांबेल
या चॅलेंजनुसार रेस्टॉरंटच्या बाहेर काही खांब लावण्यात आलेले आहेत. त्यावर २० टक्के डिस्काऊंट, १५ टक्के डिस्काऊंट, १० टक्के डिस्काऊंट, ५ टक्के डिस्काऊंट असं लिहिलेलं आहे. ज्या खांबामधून ग्राहक रेस्टॉरंटच्या आत येऊ शकेल तेवढं डिस्काऊंट त्या ग्राहकाला देण्यात येणार आहे.
जे लोक कुठल्याच खांबामधून येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी रेस्टॉरंटच्या आतमध्ये येण्यासाठी एक वेगळं गेट असेल. पण त्यांना मात्र कोणताच डिस्काऊंट दिला जाणार नाही. कारण वजन जास्त असल्याने त्यांना कोणत्याही खांबातून आत येता आलेलं नाही.
मुंग्या-पाली-झुरळं-माशा पळवून लावणारे ६ घरगुती उपाय- विकतच्या किटकनाशकांची गरजच नाही
त्यामुळे मग त्यांच्यासाठी कोणताही डिस्काऊंट नाही. हा गेम खेळत रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री करणे आणि आपल्या खाद्यपदार्थांवर डिस्काऊंट मिळवणे हे अनेकांना खूपच मजेशीर वाटत आहे. त्यामुळे साहजिकच या रेस्टॉरंटमधली गर्दी वाढली असून सोशल मीडियावरही या डिस्काउंट देणाऱ्या रेस्टॉरंटची गोष्ट व्हायरल होत आहे..काही जणांना मात्र ही कल्पना अजिबात आवडलेली नाही. कारण वजनावरून असं डिस्काऊंट देणं चुकीचं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.