Lokmat Sakhi >Social Viral > पनीर लबाबदार खाताय की भलते काही? पनीरची भयानक नवी डिश.. व्हायरल फोटो पाहून लोक घाबरले..

पनीर लबाबदार खाताय की भलते काही? पनीरची भयानक नवी डिश.. व्हायरल फोटो पाहून लोक घाबरले..

Restaurant Writes 'Paneer Labrador' Instead of 'Lababdar' : रेस्टॉरंटमधील 'त्या' पदार्थाच्या नावाची चर्चा... नाव वाचून उडाला गोंधळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 12:01 PM2022-12-16T12:01:45+5:302022-12-16T12:06:18+5:30

Restaurant Writes 'Paneer Labrador' Instead of 'Lababdar' : रेस्टॉरंटमधील 'त्या' पदार्थाच्या नावाची चर्चा... नाव वाचून उडाला गोंधळ...

Restaurant Writes 'Paneer Labrador' Instead of 'Lababdar' | पनीर लबाबदार खाताय की भलते काही? पनीरची भयानक नवी डिश.. व्हायरल फोटो पाहून लोक घाबरले..

पनीर लबाबदार खाताय की भलते काही? पनीरची भयानक नवी डिश.. व्हायरल फोटो पाहून लोक घाबरले..

आजपर्यंत आपण पनीरचे वेगवेगळे प्रकार खाल्ले आहेत. त्यात पनीर पसंदा, मटर पनीर, पालक पनीर, पनीर मसाला यांसारख्या डिशेशचा समावेश होतो. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा लग्नातील बुफे पद्धतीत, त्या पदार्थापुढे त्याच्या नावाची पाटी लिहिलेली असते. हे आपण अनेकदा पाहिले आहे. कधी कधी आपल्याला तो पदार्थ कोणता आहे हे समजल नाही तर आपण त्या पाटीवरील नाव वाचून तो खायचा की नाही ते ठरवतो. पण समजा एखाद्या वेळेस या पाटीवरील पदार्थाचे नावच चुकीचे लिहिले असेल... तर काय पंचाईत होईल ?... याचा विचार न केलेलाच बरा... (Restaurant Writes 'Paneer Labrador' Instead of 'Lababdar').

नक्की भानगड काय आहे ? 

आजकाल ऑटोकरेक्टचा जमाना आहे. आपण रोजच्या कामात याचा सहज वापर करतो. पण जर एखाद्या वेळेस या ऑटोकरेक्टने काम करणे थांबविले तर काय होईल? याचे उत्तम उदाहरण देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नंदिता अय्यर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका रेस्टॉरंटच्या बुफे टेबलवरील पदार्थाच्या नावाची पाटी दिसत आहे. या बुफेमधे 'पनीर लबाबदार' नावाची डिश होती परंतु पाटी लिहिणाऱ्याने 'पनीर लबाबदार' न लिहिता चक्क 'पनीर लेब्राडोर'असे लिहिले आहे. 'पनीर लेब्राडोर' नावाची अशी पनीरची कोणतीच डिश अस्तित्वात नाही. याउलट 'लेब्राडोर' ही कुत्र्याची एक जात आहे. आता ही चुकी पाटी लिहिणाऱ्याची आहे की कॉम्प्युटर साहेबांच्या ऑटोकरेक्टची हे देवच जाणे...

 

कमेंट्समध्ये काय काय लिहिलं आहे ?

हा फोटो बघून कोणीही पोट धरून हसायला सुरुवात करेल. या फोटोला बघताच लोकांनी त्यावर मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले आहे की, मजेदार...परंतु माझ्या 'लेब्राडोरला' हे आवडणार नाही. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, शाकाहारी हॉट डॉगसाठी हा एक नवीन शब्द आहे का? तसेच 'ऑटोकरेक्टचा खतरा' असे म्हणून लोकांनी ऑटोकरेक्टची सुद्धा खिल्ली उडविली आहे. 

Web Title: Restaurant Writes 'Paneer Labrador' Instead of 'Lababdar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.