Lokmat Sakhi >Social Viral > अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..

अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..

Revealed! Here's why Munawar Faruqui got divorced : बिग बॉस सिझन १७ चा विजेता मुनव्वर फारुकी कायम वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 02:40 PM2024-01-29T14:40:44+5:302024-01-29T17:32:23+5:30

Revealed! Here's why Munawar Faruqui got divorced : बिग बॉस सिझन १७ चा विजेता मुनव्वर फारुकी कायम वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला...

Revealed! Here's why Munawar Faruqui got divorced | अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..

अफेअर्स-लग्न-घटस्फोट आणि मुलाची कस्टडी, बिग बॉसचा हिरो ठरलेल्या मुनव्वरच्या आयुष्याची चित्तरकथाच..

धुव्वादार खेळीनंतर स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. विशेष म्हणजे वाढदिवस असतानाच चाहत्यांकडून त्याला हे स्पेशल गिफ्ट मिळाले असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या विजयानंतर सर्वच स्तरातून कौतुकाचं वर्षाव होत आहेच, पण तो नेहमी अफेअर्समुळे प्रकाशझोतात राहिला आहे. व्यावसायिक ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीत अडकला आहे (Relationships).

घटस्फोटीत मुनव्वरने बिग बॉसच्या सिझनमध्ये रिलेशनशिपबाबत अनेक खुलासे देखील केले होते (Big Boss). त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या? मुनव्वर आणि बायकोमध्ये फुट कशामुळे पडली? पाहा(Revealed! Here's why Munawar Faruqui got divorced).

बिग बॉस घरात असतानाच गर्लफ्रेंडने केला ब्रेकअप..

बिग बॉस सिझन १७ च्या आधी कंगना रणौतचा शो 'लॉकअप'मुळे मुनव्वर चर्चेत आला होता. या स्पर्धेत त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. यादरम्यान तो बदाम गर्ल फेम अंजली अरोराला डेट करत असल्याची चर्चा होती. 'लॉकअप'नंतर तो नाझीला या तरुणीला डेट करत होता. बऱ्याचदा ते दोघे एकत्र स्पॉट देखील झाले. पण बिग बॉसच्या घरात आयशासोबत नाव जोडल्यानंतर, नाझिलाने स्वतः सोशल मीडियावर मुनव्वरशी तिचा कोणताही संबंध नाही, असे जाहीर केले.

जय हिंद! देशाला लाभली पहिली महिला सुभेदार, सैन्यात मिळाली बढती..देशाच्या लेकीची जिद्द अशी की..

मुनव्वरचा घटस्फोट नेमका कशामुळे झाला?

बिग बॉसच्या सिझनमधील एका एपिसोडमध्ये स्पर्धक ऐश्वर्या शर्मा हिने मुनव्वरला घटस्फोट का झाला? यासह पूर्वश्रमीच्या पत्नीबद्दल काही प्रश्न विचारले, तेव्हा मुनव्वरने या गोष्टी शेअर करण्यास टाळाटाळ केला. मात्र, त्यानंतर त्याने खुद्द याबद्दल खुलासा केला.

एक्स पत्नीबद्दल बोलताना मुनव्वर म्हणाला, 'पूर्व पत्नी म्हणजेच जास्मिनने दुसरं लग्न कधी केलं, याबद्दल मला कल्पनाही नव्हती. १० ते १५ दिवसानंतर, जेव्हा मी माझ्या मुलाला म्हणजेच, मिखैलला घरी बोलावले तेव्हा कळलं जास्मिनने दुसरे लग्न केले. जेव्हा जास्मिनच्या वडिलांना फोन करून विचारले ही बातमी खरी आहे का? तेव्हा त्यांनी, मिखैल माझ्याबरोबर आहे, जास्मिनने दुसरं लग्न केलं, व ती दुसऱ्या शहरात गेली असल्याची माहिती मिळाली.'

'वो स्त्री है...! केकमध्ये भरलं रगडा-गोड चटणी, कडेने लावली शेव..पाणीपुरी केकचा व्हिडिओ व्हायरल..

२०१७ साली मुनव्वरने जास्मिनसोबत लग्नगाठ बांधली. मात्र, या दोघांनी २०२२ साली आपले नाते संपुष्टात आणले. त्या दोघांना मिखैल नावाचा लहान मुलगा असून, मुलाची कस्टडी मुनव्वरला मिळाली आहे. 

Web Title: Revealed! Here's why Munawar Faruqui got divorced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.