पूर्वीच्या काळात स्वयंपाक करण्यासाठी मुख्यत्वे करून मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार स्टेनलेसस्टील, काचेची भांडी, जर्मन अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनलेल्या भांड्यांचा वापर केला जाऊ लागला. यामुळे मातीची भांडी वापरणे काळानुरूप मागे पडत गेले. असे असले तरीही मातीच्या भांड्यात स्वयंपाक करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यास, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही अन्नपदार्थात फार मोठ्या प्रमाणात राखले जाते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मातीच्या भांड्यात असणारे लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यास मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्त्व सुरक्षित राहतात(Everything You Need To Know About Clay Pot Cleaning).
मातीच्या भांड्यात जेवण करण्याचे अनेक फायदे असले तरीही त्यांची स्वच्छता ठेवणे (How to clean claypot or Mudpot after cooking) हे तितकेच कठीण काम असते. या भांड्याना वेळच्यावेळी धुवून, पुसून स्वच्छ केले नाही तर अशी मातीची भांडी लवकर खराब होतात. ही भांडी कालांतराने कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ बनवण्यायोग्य राहत नाही. अशावेळी आपण ही मातीची भांडी वेळीच स्वच्छ करून ठेवली (Easy Ways To Clean Clay Utensils) पाहिजे नाहीतर या भांड्यांना बुरशी लागून ती खराब होऊ शकतात. अशी मातीची भांडी खराब होऊ नये म्हणून ती स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक लक्षात ठेवूयात(Best way to wash clay cookware).
मातीची भांडी स्वच्छ कशी करावीत ?
१. सगळ्यातआधी मातीच्या भांड्यात गरम उकळवून घेतलेले पाणी ओतावे. हे गरम पाणी भांड्यात ओतून थोड्यावेळासाठी ते मातीच्या भांड्यात तसेच ठेवून द्यावे.
२. त्यानंतर एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा, व्हिनेगर घेऊन त्याची घट्टसर पेस्ट तयार करून घ्यावी. आता लिंबू अर्ध कापून ही पेस्ट त्या लिंबावर लावून मातीची भांडी स्वच्छ घासून घ्यावीत.
बिडाचा तवा विकत तर आणला पण तो ' सिझन ' कसा करायचा? १० टिप्स, वापरायला झटपट तयार...
३. त्यानंतर गरम पाण्याचा वापर करून ही भांडी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावीत.
४. आता ही भांडी संपूर्ण सुकेपर्यंत उन्हांत किंवा फॅनखाली वाळवून घ्यावी.
५. मातीची भांडी साफ करण्यासाठी साबण कधीही वापरू नका. मातीची भांडी साबण सहज शोषून घेतात. त्यामुळे या भांड्यांमध्ये ठेवलेल्या अन्न आणि पाण्यामधून साबणाचे कण शरीरात जाऊन आरोग्याला मोठी हानी पोहोचवू शकतात.
लोखंडाची कढई, खलबत्ता गंजले आहेत? ५ टिप्स - गंज निघेल झटपट - स्वयंपाक करताना टेन्शन नाही..
तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...
किचनच्या भिंतीवरचे तेलाचे मेणचट चिकट डाग काढण्यासाठी ४ सोपे उपाय, भिंत दिसेल स्वच्छ-चकचकीत...
१. मिठाचा वापर :- भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता. मीठ हे सर्वोत्कृष्ट नॉन टॉक्सिक क्लिनर मानलं जातं. हे मातीच्या भांड्यांची घाण साफ करते आणि त्यांना बॅक्टेरिया मुक्त ठेवतं.
२. बेकिंग सोडा :- मातीचं भांडं अनेकवेळा धुतल्यानंतरही त्यात अन्नाचा वास येत राहतो. अशा परिस्थितीत बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो.
३. गरम पाणी :- मातीच्या भांड्यांमध्ये अन्न आणि पाण्याचे डाग सहज चिकटतात. त्याची नुसत्या पाण्याने सुटका करणं जवळजवळ अशक्य आहे. अशावेळी तुम्ही गरम पाण्याची मदत घेऊ शकता. ही भांडी गरम पाण्यात टाका आणि थोडा वेळ भिजवून ठेवा. यामुळे डाग मोकळे होतील आणि भांडी हलकेच घासून स्वच्छ होतील.