Lokmat Sakhi >Social Viral > २०२३ मध्ये जगभरातल्या तारुण्याला पडली ' रिज ' शब्दाची भुरळ, ' असे ' त्या शब्दात काय आहे की..

२०२३ मध्ये जगभरातल्या तारुण्याला पडली ' रिज ' शब्दाची भुरळ, ' असे ' त्या शब्दात काय आहे की..

Rizz is Oxford's word of the year for 2023. Do you have it? : २२०० कोटी शब्दांमध्ये 'रिज' वर्ड ऑफ द इअर, जेन झी तरुणाईंचा खास शब्द, शब्दाप्रमाणे करतो मोहित, पाहा याचा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 01:22 PM2023-12-05T13:22:08+5:302023-12-05T13:56:33+5:30

Rizz is Oxford's word of the year for 2023. Do you have it? : २२०० कोटी शब्दांमध्ये 'रिज' वर्ड ऑफ द इअर, जेन झी तरुणाईंचा खास शब्द, शब्दाप्रमाणे करतो मोहित, पाहा याचा अर्थ

Rizz is Oxford's word of the year for 2023. Do you have it? | २०२३ मध्ये जगभरातल्या तारुण्याला पडली ' रिज ' शब्दाची भुरळ, ' असे ' त्या शब्दात काय आहे की..

२०२३ मध्ये जगभरातल्या तारुण्याला पडली ' रिज ' शब्दाची भुरळ, ' असे ' त्या शब्दात काय आहे की..

ऑक्सफर्ड डिक्शनरीचा (Oxford Dictionary) वापर सध्या जगातील प्रत्येक व्यक्ती करत आहे. पुस्तक जरी नसलं तरी, गुगलद्वारे लोकं ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये शब्दाचा अर्थ शोधतात. १८८४ साली प्रकाशित झालेली डिक्शनरी कमी काळात नावलौकिक झाली. तेव्हापासून ही डिक्शनरी 'वर्ड ऑफ द इअर'ची (Word of the Year) घोषणा करते. सध्या जेनरेशन झेड म्हण्जेच जेन झी तरुणाईंचा जमाना आहे. त्यांची डिक्शनरी वेगळीच आहे. त्यांच्याच डिक्शनरीमधील एक शब्द सध्या चर्चेचा विषय तर ठरली आहेच, शिवाय त्यातील एक शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या प्रेसने 'वर्ड ऑफ द इअर' म्हणून घोषित केले.

'रिज' असा तो शब्द असून, सध्या इंटरनेटवर या शब्दाची जोरदार चर्चा होत आहे (Social Viral). अनेकांना या शब्दाचा अर्थ माहित नाही. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय? या शब्दाची सोशल मीडियात एवढी चर्चा का? या शब्दाचा वापर नेमका कुठे आणि कसा होतो? या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे(Rizz is Oxford's word of the year for 2023. Do you have it).

अँड द वर्ड ऑफ द इअर गोस टू..

२०२३ या वर्षातील सर्वोत्तम शब्दाचा मानकरी 'रिज' या शब्दाला मिळाला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. खरं तर, वर्ड ऑफ द इअरच्या यादीमध्ये रिज, सिच्युएशनशिप, स्विफ्टी, प्रॉम्प्ट, सीड फ्लॅग, डी-इंफ्लुएंसिंग, हीट डोम आणि पॅरासोशियल या ८ शब्दांचा समावेश होता. त्यातून 'रिज' या शब्दाची निवड करण्यात आली.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, २२०० कोटी शब्दांच्या विश्लेषणाच्या आधारे, या आठ शब्दांची निवड झाली. या शब्दांनी २०२३ साली सामाजिक बदल आणि ट्रेण्डला दर्शवले होते. २०२२ साली ऑक्सफर्डने 'गॉबलिन मोड' या शब्दाला वर्ड ऑफ द इअर म्हणून घोषित केले होते.

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

'रिज' हा शब्द इतका का झाला व्हायरल?

हॉलीवूडचा दमदार अभिनेता टॉम हॉलंडने 'रिज' या शब्दाचा वापर केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. त्याने या शब्दाचा वापर एका मुलाखतीत केला होता. तेव्हापासून हा शब्द व्हायरल झाला असून, अनेक जण या शब्दाचा वापर आपल्या दैनंदिन संवादात करत आहे. मुख्य म्हणजे या शब्दाचा अधिक वापर, जेन झी आणि जेन अल्फा पिढीतील तरुणाई करीत आहे.

१०० वर्षांची झाली आजी तरीही तिला आपण पन्नाशीत असल्याचं वाटतंय, पाहा आजीची भन्नाट प्रतिक्रिया..नेटकरी म्हणतात..

'रिज' या शब्दाचा अर्थ काय?

रिज हा शब्द एखाद्या व्यक्तीची स्टाईल, मोहिनी, सौंदर्य, आकर्षण किंवा रोमँटिक असल्याचे दर्शवते. या शब्दाचा वापर अनेक जण 'रिज अप' म्हणून देखील करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आकर्षित करणे, किंवा मोहित करणे.

Web Title: Rizz is Oxford's word of the year for 2023. Do you have it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.