Lokmat Sakhi >Social Viral > गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा!

गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा!

Social viral: प्रत्येक तरुण जोडप्याने बघायलाच पाहिजे असा हा व्हिडिओ आहे.. तरुण मुली तर गुरमीतवर आधीच फिदा असतात. आता त्यांचा हा व्हिडिओ (viral video) पाहून अनेक जणी त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 06:28 PM2022-03-10T18:28:06+5:302022-03-10T18:29:02+5:30

Social viral: प्रत्येक तरुण जोडप्याने बघायलाच पाहिजे असा हा व्हिडिओ आहे.. तरुण मुली तर गुरमीतवर आधीच फिदा असतात. आता त्यांचा हा व्हिडिओ (viral video) पाहून अनेक जणी त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. 

Romantic video of Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee.. Netizens said a husband should be like Gurmeet | गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा!

गरोदर बायकोसाठी गुरमित चौधरीने केलं असं काही, नेटिझन्स म्हणाले याला म्हणतात नवरा!

Highlightsआपल्यासाठी गुरमीत जे करतोय, ते पाहून डेबिना अतिशय आनंदित झाली असून दोघांचं एकमेकांना समजून घेणं, एकमेकांकडे बघणं खरोखरंच अतिशय रोमॅण्टिक आहे..

छोट्या पडद्यावरचं अतिशय रोमँटिक आणि प्रसिद्ध जोडपं म्हणजे गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि डेबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee). त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, त्यांचे काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सूक असतात. आता आपल्याला माहितीच आहे लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी गुरमीत आणि डेबिना आई- बाबा होणार आहेत. त्यामुळे सध्या ते खूपच आनंदात असून त्यांचा एक व्हिडिओ सध्या साेशल मिडियावर कमालीचा गाजतो आहे..

 

एका प्रेग्नंट मुलीला आपल्या नवऱ्याकडून थोडी फार समजुतीची अपेक्षा असते. त्याने खूप काही मदत केली नाही, तरी एकवेळ चालेल, पण तिला या काळात नवऱ्याकडून मानसिक आधार, भक्कम साथ हवी असते. त्याच्या नुसत्या सहवासाने आणि त्याच्या प्रेमळ सोबतीने ती या काळात होणारा सगळाच मानसिक, भावनिक, शारिरीक त्रास सहन करू शकते. अशीच भक्कम साथ सध्या डेबिनाला गुरमीतकडून मिळत आहे.

 

डेबिनाने काही दिवसांपुर्वीच त्यांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. यामध्ये दिसतंय की डेबिना प्रेग्नंट असल्याने तिला तिच्याच हालचाली आता जड झाल्या आहेत. त्यामुळे ती एका खुर्चीवर बसली आहे आणि सॅण्डल घालायचा प्रयत्न करते आहे. पोट चांगलेच वर आलेले असल्याने ती चांगलीच अवघडून गेली आहे आणि खाली वाकून किंवा पाय वर करून सॅण्डलचा बेल्ट लावणं तिला जमत नाहीये. तिचं हे अवघडलेपण गुरमीतने पाहिलं. तो तिच्याजवळ आला आणि अगदी अलगद प्रेमळपणे तिला सॅण्डल घालून दिल्या. आपल्यासाठी गुरमीत जे करतोय, ते पाहून डेबिना अतिशय आनंदित झाली असून दोघांचं एकमेकांना समजून घेणं, एकमेकांकडे बघणं खरोखरंच अतिशय रोमॅण्टिक आहे..


 

Web Title: Romantic video of Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee.. Netizens said a husband should be like Gurmeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.