Join us  

कार - बाईकवर करा बटाट्याचा देसी जुगाड, वायपरपेक्षा भारी; समोरचं दिसेल लख्ख स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 2:15 PM

Rub your Car with a Potato and WATCH WHAT HAPPENS : बटाट्याच्या तुकड्यासमोर मोठी टेक्नोलॉजीही पडेल फेल

सध्या पावसाच्या सरी सगळीकडे बरसत आहेत (Monsoon Hacks). यादिवसात धो - धो कोसळणाऱ्या पावसाचा आनंद सगळ्यांनाच घ्यावासा वाटतो. मग पावसाळ्यात मस्त फिरायला किंवा ट्रेकिंगला जाण्याचे प्लॅन्स आखले जातात. या दिवसात कारमधून संपूर्ण फॅमिली किंवा मित्र परिवार फिरायला जातात (Cleaning Tips). अशावेळी आपण गाडी घेऊन फिरायला तर निघतो परंतु रस्त्यात साचलेलं पाणी, मुसळदार पडणारा पाऊस या सगळ्याचा आनंद एका मर्यादेपर्यंत चांगला वाटतो.

पण नंतर काचेमुळे समोरचे दृश्य हे धुरकट दिसू लागते. ज्यामुळे बऱ्याचदा अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी काय करावं हे सुचत नाही. जर गाड्याच्या काचातून पाण्यामुळे धुरकट दिसत असेल तर, बटाट्याचा सोपा उपाय करून पाहा. यानंतर आपल्याला वायपरची गरज पडणार नाही. मिनिटात काचा क्लिन होतील(Rub your Car with a Potato and WATCH WHAT HAPPENS).

गादी चालकांनो कच्च्या बटाट्याचा हॅक आपल्या उपयोगी पडेल

वारंवार सांगूनही मुलं ऐकत नाहीत, उद्धटासारखं वागतात? ५ चुका टाळा; मुलं शहाण्यासारखं वागतील

गाडीच्या काचेवर आणि आरशावर पावसाचे पाणी टिकून राहू नये म्हणून, आपण एका कच्च्या बटाट्याचा वापर करून पाहू शकता. यासाठी या कच्च्या बटाट्याचे २ तुकडे करून घ्यावेत. आता बटाट्याचा तुकडा घेऊन तो काचेवर, आरशावर तसेच समोरच्या विंडशिल्डवर २ ते ३ मिनिटे घासून घ्यावा. यामुळे काचेवर नैसर्गिक आवरण तयार होईल, ज्यावर पावसाचे पाणी थांबणार नाही.

ज्वारीचे आप्पे करा फक्त १५ मिनिटांत, गुबगुबीत ग्लूटन फ्री आप्पे-नाश्त्याला बेस्ट-शाळेच्या डब्यासाठीही मस्त

काही वेळानंतर काचांवर पाणी ओतून पाहा. काचांवर पाणी साचणार नाही. या सोप्या झटपट उपायामुळे काचेवर, आरशावर पावसाचे पडणारे पाणी टिकून राहणार नाही. शिवाय आपल्याला स्पष्ट दिसण्यास मदत होईल. या ट्रिकमुळे पावसातही गाडी चालवणे सोपे होईल.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स