हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे याठिकाणी नेहमीच वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र आलेली असतात. काही शांत असतात आणि त्यांना कुणाशी काही देणे- घेणे नसते. आपण भले नी आपले काम भले असा त्यांचा विचार असतो. काही जण मात्र याउलट असतात. कोणाची कोणती गाेष्ट त्यांनी कधी खटकेल, याचा काही नेमच नसतो. त्यामुळे मग कधी वेटरसोबत तर कधी इतर ग्राहकांसोबत त्यांचे खटके (rude customers) उडतात. आणि मग त्या सगळ्या परिसराचाच माहोल खराब होऊन जातो. आपल्या कॅफेमध्ये असा प्रसंग येऊ नये आणि प्रत्येकालाच आपापल्या परीने तिथे शांततेत एन्जॉय करता यावे, यासाठी इंग्लंड येथील एका कॅफे (interesting rule by the cafe in UK) मालकाने एक नवाच नियम काढला आहे.
उस्मान हुसैन असं या कॅफे चालकाचं नाव असून मँचेस्टर येथे त्यांचा कॅफे आहे. मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज यांनी दिलेल्या वृत्तानुसार हुसैन यांनी त्यांच्या कॅफेमध्ये एक बोर्ड लावला आहे.
दिवाळीत बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? ८ पर्याय, प्रेमाचं सुंदर गिफ्ट, बहिण होईल खुश
त्या बोर्डवर असा नियम लिहिला आहे की कॅफेमध्ये आल्यावर तुम्ही स्टाफशी किंवा अन्य ग्राहकांशी कसे वागता, यावर तुमच्या त्या पदार्थाची किंमत अवलंबून असेल. तुमचे वागणे उद्धटपणाचे असेल तर त्या पदार्थाच्या मुळ किमतीपेक्षा दुप्पट रक्कम तुम्हाला मोजावी लागेल. हुसैन यांनी सांगितले की हा बोर्ड लावल्यानंतर आम्हाला अनेकांच्या वागणुकीत आश्चर्यकारक बदल जाणवला. लोक स्टाफशी खूपच मैत्रीपुर्वक वागू लागले आणि त्यामुळे अर्थातच कॅफेचे वातावरणही चांगले राहण्यास मदत होत आहे.
अमेरिकेतील एका कॅफेमध्ये अशा पद्धतीचा बोर्ड लावण्यात आला आहे. तो बोर्ड हुसैन यांनी सोशल मिडियावर पाहिला होता.
वेटलॉस करायचाय? ब्रेकफास्ट करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा, वजन वाढण्याची चिंता विसरा
त्यामुळे मग त्यांनीही विचार केला आणि कॅफेमध्ये प्रत्येकालाच एन्जॉय करता यावे, तिथले वातावरण पॉझिटीव्ह, आनंददायी रहावे, यासाठी मग त्यांनीही हा बोर्ड लावून बघितला. आणि अर्थातच त्याचे खूप चांगले परिणाम त्यांना जाणवू लागले आहेत.