Lokmat Sakhi >Social Viral > किती फुगलीयेस? नवरा टोमणे मारायचा; तिनं १७ किलो घटवलं; अन् रुग्णालयात भरती व्हावं लागलं

किती फुगलीयेस? नवरा टोमणे मारायचा; तिनं १७ किलो घटवलं; अन् रुग्णालयात भरती व्हावं लागलं

Russia woman lose 17kg weight after husband demand : मी त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, पण शेवटी माझे हात रिकामेच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 05:59 PM2023-06-09T17:59:57+5:302023-06-09T18:41:39+5:30

Russia woman lose 17kg weight after husband demand : मी त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, पण शेवटी माझे हात रिकामेच राहिले

Russia woman lose 17kg weight after husband demand now struggled with body thinness | किती फुगलीयेस? नवरा टोमणे मारायचा; तिनं १७ किलो घटवलं; अन् रुग्णालयात भरती व्हावं लागलं

किती फुगलीयेस? नवरा टोमणे मारायचा; तिनं १७ किलो घटवलं; अन् रुग्णालयात भरती व्हावं लागलं

आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारायला हवं हे तुम्ही अनेकदा  ऐकलं असेल. कारण आपण लोकांच्या अपेक्षा सतत बदलतात किंवा वाढतात. इतरांच्या अपेक्षेप्रमाणे वागून नेहमी नैराश्यात राहण्यापेक्षा स्वत:ला वाटेल तसं राहून कायम आनंद राहीलेलं कधीही उत्तम. कारण जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तिला तुम्ही कसे दिसता याने काही फरक पडत नाही. पण काही  लोक नेहमी तुमच्या चुकाच काढतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. रशियातील बेल्गोरोड  येथिल रहिवासी असलेल्या महिलेला आपल्या नवऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करता करता गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. (Russia woman lose 17kg weight after husband demand now struggled with body thinness)

याना बोब्रोवा असे या महिलेचे नाव आहे. याना ही दक्षिण-पश्चिम रशियातील बेल्गोरोडची रहिवासी आहे. यानाने आरोग्याकडे दुर्लक्ष करून पतीच्या इच्छेला प्राधान्य दिल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे. ज्याचा तिला आता पश्चाताप होत आहे. खरे तर यानाचे फुगलेले गाल नवऱ्याला अजिबात आवडत नव्हते. तो अनेकदा बायकोला सांगत असे की त्याचे वजन खूप वाढले आहे.

नवऱ्याचे टोमणे ऐकून यानाने तिचे वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तिचे मोठमोठे गाल सपाट केले. एका रशियन टॉक शोमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, जेव्हा ती युनिव्हर्सिटीत होती, तेव्हा तिने तिचे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तो ही फक्त तिच्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी. यानाने व्यायाम तर केलाच, पण तिचा आहारही मर्यादित ठेवला. असे केल्याने तिचे शरीर सडपातळ होऊ लागले. पतीला याची कल्पना असूनही त्यानं ती जास्त बारीक होत आहे, प्रकृती ढासळत आहे याबाबत चिंता व्यक्त केली नाही.

एवढेच नाही तर पतीने यानाला लोकांना भेटण्यापासून रोखले आणि तिला नोकरीवरून काढून टाकले. म्हणजे ज्या नवऱ्यासाठी ती बारीक होत होती. ज्याच्या साठी तिनं शरीराचं नुकसान केलं. त्यानं तिची जराही कदर केली नाही. यानाने सांगितले की, ''जेव्हा मला माझ्या पतीची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्यांनी मला साथ दिली नाही. त्याने माझी अंगठी परत केली आणि मला सोडले. मी एकटीच राहीले. मी त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, पण शेवटी माझे हात रिकामेच राहिले. यात माझी चूक आहे हे मला माहीत आहे. ना माझ्या नवऱ्याचा दोष आहे ना माझ्या आई-वडिलांचा.''

यानाच्या आरोग्याच्या स्थितीबाबत सांगताना, पोषणतज्ञ मरिना माकिशा यांनी सांगितले की, ''यानाचे शरीर आता खूप खराब झाले आहे. स्नायू आणि त्वचेचं नुकसान झालं आहे. सध्या याना रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यानाने तिचे वजन 17 किलोपर्यंत कमी केले आहे. तिचे वजन आता केवळ 22 किलोवर आले आहे

Web Title: Russia woman lose 17kg weight after husband demand now struggled with body thinness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.