आपण भारतीय लोक जरी इटालियन पास्ता आणि पिझ्झा, चायनिज नूडल्स यासारख्या विदेशी पदार्थांच्या प्रेमात असलाे, तरी जगभरात असे अनेक परदेशी लोक आहेत, ज्यांना भारतीय पदार्थ खायला विशेष आवडतं (Indian food lovers). पुरी भाजी, बटाटेवडा, आलू पराठा, पावभाजी, पाणीपुरी, पुरणपोळी, इडली- डोसा असे अनेक पदार्थ परदेशी लोकांना आवडतात आणि ते खाण्यासाठी हे लोक खूप उत्सूकही असतात. असंच तर आहे या रशियन सूनबाईंचं.. (Russian Bahu making excellant roti, chapati or fulka) ही तर भारतीय पदार्थ आणि भारतीय संस्कृती यांच्या एवढी प्रेमात आहे, की ती आता आपले अनेक पदार्थ (Indian food) करायला शिकली आहे. तिचा फुलके करण्याचा आणखी एक व्हिडिओ (viral video) नुकताच सोशल मिडियावर गाजतो आहे.
कॅटरिना रॅमन Ekaterina Raman असं तिचं नाव असून ती व्हिडिओ क्रियेटर आहे. इन्स्टाग्रामवर ती बरीच ॲक्टीव्ह असून तिने केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी ती त्यावर शेअर करत असते.
रशियन तरुणीनं लाटले आलू के पराठे, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले, पराठे बेलना..
मागे एकदा तिने बटाट्याचे पराठे केले होते आणि तो व्हिडिओ शेअर केला होता. परदेशी असूनही ज्या सराईतपणे तिने पराठे लाटले, ते पाहून नेटकरींना तिचे भारीच कौतूक वाटले होते. आता पुन्हा एकदा तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल करतो आहे. या व्हिडिओमध्ये तिने फुलके लाटले असून ते अगदी टम्म फुगले आहेत.
भारतीय कुटूंबातल्या एखाद्या सुगरण स्त्रीने ज्याप्रमाणे फुलके करावेत, त्याप्रमाणे तिने ते फुलके केले आहेत. पोळी किंवा फुलका तेव्हाच उत्तम मानला जातो, जेव्हा तो फुगतो.
ऑफिसमधल्या ७० सहकाऱ्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण, आला फक्त एक; म्हणून तिने ‘असं’ टोकाचं पाऊल उचललं...
या रशियन बहूचा फुलका अगदी टम्म फुगला आहे. त्यावरूनच ती त्यात आता एक्सपर्ट झाली आहे, हे दिसून येते. फुलके लाटणं तिच्यासाठी मुळीच सोपं नव्हतं. कारण तव्यावर फुलका टाकताना तिला भीती वाटायची, मग ती कशी सरावाने फुलका तव्यावर टाकून भाजायला शिकली, हे देखील तिने एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.