भारतीय क्रिकेटचा देव, महान फलंदाज सचिन तेंडूलकर सध्या क्रिकेटच्या मैदानात दिसत नसला तरी तो बराच चर्चेत असतो. मास्टर ब्लास्टर भटकंतीसाठी कधी कुठे जाईल याचा अंदाज लावणं कठीण आहे. कधी तो भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसतो तर कधी पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीतील साम्य दर्शवणारे व्हिडिओ पोस्ट करतो. (Sachin tendulkars simplicity wins fans hearts eats stovetop food sitting on floor watch video)
सध्या सोशल मीडियावर सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो जमिनीवर बसून चुलीवरचं जेवण खातााना दिसत आहे. यापूर्वीही त्यानं त्याच्या इंस्टाग्रामवरून असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात जो भारतीय अन्नपदार्थांचा जमिनीवर बसून आस्वाद घेत होता.
गेल्या दोन दिवसांपासून या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सचिनला चुलीवरचं जेवणं खूप आवडल्याचं दिसून येतंय. तर दुसऱ्या व्हिडिओत तो खेळतोय आणि व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सचिननं २९ डिसेंबरला एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये राजस्थानमधील एका ठिकाणी मातीच्या चुलीवर अन्न शिजवलं जात होतं. चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव नेहमीच अनोखी असते असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं होतं.
सचिन तेंडूलकर पुढे म्हणाला की, मला स्वयंपाक करता येतो पण गोल चपात्या बनवता येत नाहीत. चुलीवर बनवलेल्या अन्नाची चवच वेगळी असते. गॅसवर शिजवलेल्या जेवणापेक्षा ते चविष्ट असतं. सचिन तूप आणि गूळ घेऊन जेवायला बसतो. त्यावर तो म्हणाला, “मी आयुष्यात एव्हडं तूप कधीच खाल्लं नाही. हे प्रेमाने भरलेलं तूप आहे.
नंतर हे देशी तूप आहे का?” असं तो त्या महिलांना विचारतो. व्हिडिओवर सचिनचे चाहते म्हणताहेत, 'तू खूप चांगला माणूस आहे. साक्षात क्रिकेटचा देव.... हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.
याआधी शेअर केलेल्या व्हिडिओत सचिन रस्त्यावर चहा पिताना दिसला होता. यावेळी त्यानं चहाविक्रेत्यांसोबत फोटोसुद्धा काढला. रोड ट्रिपवर चहाचा ब्रेक असायलाच हवा असं कॅप्शन त्यानं या पोस्टला दिलं होतं.