आपण सारखं ऐकतो की आजकालचं जग फारच वाईट आहे. महिलांसाठी सुरक्षित नाही. महिलांविरुद्ध अत्याचारांचे प्रमाण वाढतचं चालले आहे.(Safety First: Every woman should remember these 5 things, it is important to always stay safe) स्वत:चे संरक्षण स्वत:चं करणे फार गरजेचे आहे. आता महिलांना आत्मसंरक्षणाचे शिक्षण घ्यायला हवे हे तर अगदीच मान्य आहे. मात्र जर एखादा प्रसंग उद्भवलाच, तर अगदीच निकामी असल्यासारखे वाटते. (Safety First: Every woman should remember these 5 things, it is important to always stay safe)वेळे प्रसंगी पटकन काय करावे हे सुचत नाही. प्रत्येक महिला अशा वाईट नजरांचा सामना करतच असते. आजकाल बलात्काराचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे.
आजूबाजूला अशी स्थिती असल्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्याबरोबर काही गोष्टी घेऊन फिरणे गरजेचे झाले आहे. तुम्हाला या गोष्टी माहिती असतील त्या आपल्या पर्समध्ये घेऊन फिरा. वेळेप्रसंगी उपयोगी ठरतील.
१. पेपर स्प्रे बद्दल प्रत्येक महिलेला माहिती असलेच पाहिजे. अगदी लहानसा असा हा स्प्रे असतो. तिखट पदार्थांचा वापर करून हा स्प्रे तयार केला जातो. जर तुमच्यावर एखादा प्रसंग उद्भवला तर हा स्प्रे वापरता येतो. अगदी पावरफुल असा हा स्प्रे आहे.
२. तुम्ही जर एखाद्या प्रायव्हेट गाडीमधून प्रवास करत असाल तर मग त्या गाडीचा नंबर नोट करून ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीकडे जात आहात त्याला गाडीचा नंबर पाठवून ठेवायचा.
३. नवीन ठिकाणी जर गाडीत बसला असाल तर मग गुगलमॅपचा वापर करा. तंत्रज्ञानाचा वापर करणे आजकाल अगदीच सोपे झाले आहे. गुगलमॅप बघत राहिल्याने आपण आपल्या मुक्कामा दिशेनेच जात आहोत की नाही याचा ट्रॅक ठेवता येतो.
४. शॉक इफेक्ट असलेली लहानशी वस्तू बाजारात मिळते. अगदी बोटाच्या आकाराची असते. त्यामुळे ती बरोबर घेऊन फिरणे अगदीच सोपे आहे. (Safety First: Every woman should remember these 5 things, it is important to always stay safe)जर कोणी तुम्हाला हात लावायला येत असेल तर त्या बॅटरीचा वापर करून त्या व्यक्तीला शॉक देता येतो. त्याचा झटका काही वेळासाठी राहतो.
५. आजकाल सार्वजनिक ठिकाणीही छेडछाडीचे प्रकार घडतात. महिला घाबरुन आवाज उठवत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही मदत मागितली तर इतर लोक मदत करतील. तो मनुष्य पकडला गेला तर तो इतर महिलांना त्रास देणार नाही. त्यामुळे शांत बसू नका.