साडीचा पदर, ओढणी अशा गोष्टी पिनअप करण्यासाठी आपण सर्रास सेफ्टी पिन वापरतो. पण आपली ओढणी किंवा पदर थोडासा ओढला गेला तरी तो पिनेच्या गोलाकार भागात अडकून बसतो. तो असा काही विचित्र पद्धतीने अडकतो की नंतर आपण कितीही प्रयत्न केले तरी तो पटकन निघत नाही. कितीही हळूवार प्रयत्न केला तरी पदराला किंवा ओढणीला एखादं मोठं भोक नक्की पडतं आणि महागड्या साडीचे, ओढणीचे नुकसान होते (sari ko pin mein fasne se kaise bachaye?). असं होऊ नये म्हणून काय करावं ते पाहा..(Safety pins damage expensive saree and dupatta)
साडी- ओढणी सेफ्टी पिनमध्ये अडकून फाटू नये म्हणून उपाय
साडी किंवा ओढणी सेफ्टी पिनमध्ये अडकून फाटू नयेत म्हणून काय उपाय करावे, याची माहिती nancymadaanmakeupstudio या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
Monsoon Special: वजन वाढेल म्हणून चक्क भजी खायला नाही म्हणता? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला
हल्ली बाजारात खालच्या टोकाला मोत्यासारखा गोल असणाऱ्या पिना मिळतात. या पिनांमध्ये ओढणी किंवा साडी अडकत नाही. पण तुमच्याकडे अशी पिन नसेल तर काय करावे हे पाहून घ्या.
१. मोती
पिनेमध्ये मोती अडकविणे हा एक चांगला आणि सगळ्यात सोपा पर्याय आहे. यामुळे तुमच्या साडीचा किंवा ओढणीचा भाग पिनेच्या गोलाकार वळविलेल्या तारेमध्ये अडकत नाही.
२. टिकली
माेती कुठे शोधावा असा प्रश्न पडला असेल किंवा घरात सहजासहजी मोती सापडत नसेल तर त्यापेक्षाही आणखी एक सोपा उपाय पाहा. हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुमची नेहमीची टिकली वापरू शकता.
इंचभर केस वाढायला महिनोंमहिने लागतात? २ पदार्थांचा जादुई उपाय करून पाहा- केस भराभर वाढतील
सेफ्टी पिनमध्ये २ ते ३ टिकल्या घालून ठेवा. एक टिकली घातली तरी पुरेशी आहे. पण अधिक सुरक्षितता म्हणून तुम्ही २ ते ३ टिकल्या घालून ठेव. यामुळे पिनेच्या गोलाकार वळवलेल्या तारेत ओढणी किंवा पदर अडकणार नाही.