सणावाराचे दिवस आले की, आपण महागडे ड्रेस आणि साड्या आवर्जून घालतो (Safety pin Hacks). सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाने सकारात्मक वातावरण पसरलं आहे (Fashion Tips). या दिवसात आपण नटून बाप्पाचे घरात स्वागत करतो. भारीतले ड्रेस किंवा भरजरी साड्या नेसतो. पण महागड्या साड्यांचे पदर हे फार नाजुक असतात. ओढण्या किंवा पदर एकाजागी राहावी म्हणून आपण सेफ्टी पिनचा वापर करतो. पण सेफ्टी पिनमुळे पदरावर छिद्र पडतात.
पदर- ओढणी कुठेतरी अडकून खचकन ओढल्या जाऊ नये, अशीही मनात भीती असतेच. सिल्क साड्यांवर सेफ्टी पिनचा वापर केल्याने छिद्र पडतातच. महागड्या साड्या आणि ड्रेसेसवर सेफ्टी पिनचा वापर नेमका कसा करावा? महागड्या साड्या आणि ड्रेसेसची काळजी कशी घ्यावी? पाहा(Safety pin hacks you need to know | Saree draping hacks).
टिकली
कपाळावर लावण्यात येणारी टिकलीचा वापर आपण कापडावर छिद्र पडू नये म्हणूनही करू शकता. यासाठी ज्याठिकाणी सेफ्टी पिनचा वापर कराल त्या ठिकाणी आधी दोन्ही बाजूने टिकली लावा. नंतर सेफ्टी पिन लावा. यामुळे कापडावर छिद्र पडणार नाही. शिवाय फॅब्रिकही खराब होणार नाही.
पार्लरला जायला वेळच नाही? १० रुपयात फेशिअल करा घरीच; गणेश उत्सवात दिसाल मोहक
रंगीत बटणांचा वापर
महागड्या कापडावर छिद्र पडू नये म्हणून आपण रंगीत बटणांचा वापर करू शकता. यासाठी सेफ्टी पिनमध्ये बटण लावा. आता कोणत्याही कापडावर सेफ्टी पिनचा वापर करा.
वाढत्या वजनावर कंट्रोल नाही? बाबा रामदेव सांगतात खा ३ पदार्थ; थुलथुलीत पोट - मांड्याही होतील कमी
मोती
सेफ्टी पिन पदर किंवा दुपट्टामध्ये अडकत असेल तर, मोत्यांचा वापर करा. यासाठी पदर किंवा ओढणीला सेफ्टी पिन लावण्यापूर्वी सेफ्टी पिनमध्ये मोती घाला. यामुळे सेफ्टी पिनमध्ये पदर किंवा ओढणी अडकून फाटणार नाही.