पुरुष म्हणजे फॅशनच्या बाबतीत अतिशय उदास असणारे प्राणी. कुठेही जाताना मी काय घालू असं नवऱ्याने बायकोला विचारलं नाही तरच नवल.फॅशन सोडा पण घरात किंवा बाहेर जाता-येताना घालण्याच्या कपड्यांविषयीही अनेकदा नवऱ्यांच्या मनात फासशी नीटनेटकेपणाची भावना असतेच असं नाही. आपण जर त्यांच्या कपड्यांकडे लक्ष दिलं तरच ते वेळच्या वेळी धुतले जातात, इस्त्री केले जातात आणि न लागणारे कपडे टाकूनही दिले जातात. पण महिलांनी या विषयात लक्ष घातले नाही तर मात्र त्यांच्या कपड्यांचे आणि राहणीमानाचे अवघड होऊन जाते. भोकं पडलेले, कित्येक महिने न धुतलेले कपडे पुरूष तसेच वापरु शकतात. आपल्याला वाटेल हे फक्त आपल्या नवऱ्यांच्या बाबतीचतच होतं. पण बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी बेबो हिच्या बाबतीतही असं होतं (Saif Ali Khan Style Kareena Spoke about the Same).
करीना कपूरला कपड्यांचे आणि फॅशनचे किती वेड आहे हे आपण तिच्या फोटोसेशनवरुन किंवा तिच्या एकूण फॅशन लूकवरुन समजू शकतो. पण सैफ मात्र त्याच्या एकदम विरुद्ध आहे. नुकत्याच करीनाने पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सैफ अली खानच्या स्टाइलबद्दल वक्तव्य केले. सैफला आपल्या फॅशनबद्दल फारसे काही देणे-घेणे नसते असे करीना म्हणाली. तो ट्रॅकपँटची एक पेअर गेले ५ वर्ष वापरत आहे. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो नवीन पेअर विकत घेणार नाही असेही करीना यावेळी म्हणाली. मी त्याला म्हणाले की सैफ तुझ्या टी शर्टला ५ होल पडली आहेत, तर तो इटस ओके, फाईन असं म्हणतो असेही करीनाने सांगितले. त्यामुळे अभिनेता असूनही सैफ अली खान किती साधासुधा आहे हे आपल्याला समजलेच असेल.
तरीही सैफ मला सर्वात जास्त स्टायलिश पुरुष वाटतो अशी पुष्टी जोडत तिचे त्याच्यावर असणारे प्रेम दाखवून दिले. सैफला कोणीच स्टाईल करु शकत नाही कारण स्टायलिश जे सांगतो त्याच्या एकदम विरुद्ध गोष्ट सैफ घालतो असे करीना दुसऱ्या एका मुलाखतीत म्हणाली. तो उपजतच स्टायलिश असून त्याची कपडे, इंटेरीयर, फूड, पुस्तकं, ठिकाणं या सगळ्याबाबतची टेस्ट अतिशय वेगळी आहे. असे असले तरी स्टाईलमध्ये सैफचा हात कोणीच पकडू शकत नाही असेही करीना म्हणाली. करीना लवकरच आपल्याला अमिर खानसोबत लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात दिसणार असून सैफ आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे.