सोशल मीडिया ही एक अशी जागा आहे जिथे लोक त्यांच्या इच्छेनुसार व्यक्त होऊ शकतात किंवा काहीही बोलू शकतात. एका मॅट्रिमोनियल साईटवर एका तरुणीने तिच्या होणारा पती नेमका कसा असावा हे सांगत तिच्या काही अटींची लिस्टच शेअर केली आहे. ज्याची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तरुणीचं प्रोफाइल पाहिल्यानंतर तिला मेसेज पाठवणाऱ्या एका तरुणाने त्यांचं संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
रेडिटवरील आपल्या पोस्टमध्ये तरुणाने स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिलं की, जेव्हा मी तिला मेसेज केला की , मला तिचं प्रोफाइल आवडलं. तू मला तुझ्या इच्छा काय आहेत ते सांग... यावर मुलीने खूप लाजत विचारलं, तुला खरोखरच जाणून घ्यायचं आहे का? यावर मी हो असे उत्तर दिलं आणि अर्थात मला जाणून घ्यायचं आहे असं म्हटलं.
मुलाच्या म्हणण्यानुसार, यानंतर मुलीने त्याला तिची चेकलिस्ट पाठवली. कॅप्शनमध्ये विनोदी पद्धतीने तिने पतीसाठी असलेल्या किमान अपेक्षा सांगितल्या आहेत. या लिस्टमध्ये १८ गुण लिहिलेले होते. यामध्ये प्रामुख्याने सहा अंकी पगार म्हणजेच २.५ कोटी पगार असावा असं म्हटलं आहे. ज्यावरून सध्या जोरदार लग्न आणि अटी यावर तुफान चर्चा रंगली आहे. मुलाने मुलीला ती काय करते असं विचारलं त्यावर तिने शिक्षिका असून वर्षाला १० हजार डॉलर्स कमवते असं म्हटलं आहे.
"माझ्यावर खूप प्रेम करावं. नेहमीच मला प्राधान्य द्यावं. आर्थिकदृष्ट्या यशस्वी असावं. आत्मविश्वास असावा, कुटुंबाला महत्व देणारा आणि सर्वांशी कनेक्ट करणारा असावा. निरोगी असावा. माझ्या स्वप्नांना पाठींबा देणारा असावा. मजा-मस्ती करणारा, बाहेर फिरायला घेऊन जाणारा असावा. माझ्यासोबत प्रामाणिक असावा. माझं आयुष्य सोपं करणारा असावा" असं तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल लिस्टमध्ये म्हटलं आहे.