Join us  

सलाम जिद्दीला ! व्हीलचेअरवर फूड डिलिव्हरी करणारी मुलगी, संघर्षाची कहाणी वाचून वाढेल तुमचीही हिंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 12:06 PM

Swiggy delivery girl arrives in a wheelchair For Food Delivery : खरे हिरो कठोर परिश्रम करत आणि कारणांकडे दुर्लक्ष करत आपलं आयुष्य जगतात.

ठळक मुद्दे या मुलीच्या जिद्दीची कमाल असल्याचे म्हणत तिच्या लढाऊ वृत्तीला नेटीझन्सनी सलाम केला आहे. कंपन्यांनीही येत्या काळात या दिशेने अधिक पुढाकार घ्यायला हवा अशी इच्छा युजर्सनी व्यक्त केली आहे.

आपण अगदी सहज स्विगी, झोमॅटो किंवा अन्य फूड डिलिव्हरी करणाऱ्या अॅपवरुन फूड ऑर्डर करतो. आपली ऑर्डर कुठपर्यंत आली हे आपण सतत ट्रॅकही करत राहतो. काहीवेळा ट्रॅफीकमुळे तर कधी पावसामुळे कधी अन्य काही तांत्रिक कारणांमुळे ऑर्डर वेळेत आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. आपल्याला खूप भूक लागलेली असल्याने आणि वेळेत आपण मागवलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत न आल्याने आपण अगदी स्वाभाविकच डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीवर चिडतो, प्रसंगी त्याला ओरडतोही. मात्र समोरचा व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून कसा आपल्यापर्यंत आलेला असतो याचा अनेकदा आपल्याला अंदाजही नसतो (Swiggy delivery girl arrives in a wheelchair For Food Delivery). 

(Image : Google)

नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्य प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामध्ये व्हीलचेअरवर एक मुलगी पार्सल घेऊन आल्याचे दिसते . ही पोस्ट सोशल मीडियावर  लाखो यूजर्सच्या हृदयाला स्पर्श करत आहे .सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट पाहून आपल्याला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही.  झालं असं की, एका व्यक्तीने जेवण्याची ऑर्डर केली,तर या ग्राहकांकडे एक महिला  स्विगीचा टी-शर्ट घालून व्हीलचेअरवर जेवण घेऊन आली.

ही पोस्ट जगविंदर सिंग घुमान (Jagvinder Singh Ghumaan)नावाच्या युजरने लिंक्डइनवर (LinkedIn) शेअर केली आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला ऑफिसला उशीर झाला, तर तुम्ही फालतू कारणं देतात. पण खरे हिरो कठोर परिश्रम करत आणि कारणांकडे दुर्लक्ष करत आपलं आयुष्य जगतात.''

'हिंदुस्तान टाइम्स'च्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. एका युजरने म्हटलं की,  स्विगीला सलाम, कारण त्यांनी त्यांना वेगळं मानलं नाही.'' तर अजून एक युजर म्हणतो की, ''ही गोष्ट लाखो लोकांना प्रेरणा देणारी आहे, जर एखाद्यामध्ये जीवनात काहीतरी करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर ते एक दिवस आपला मार्ग शोधतातच. तसंच कंपन्यांनीही येत्या काळात या दिशेने अधिक पुढाकार घ्यायला हवा.'' स्विगीने अशाप्रकारे डिलिव्हर करणाऱ्या मुलीला व्हिलचेअर सारख्या गोष्टी उपलब्ध करुन देण्याबद्दल अनेकांनी कंपनीचे कौतुक केले आहे. तर या मुलीच्या जिद्दीची कमाल असल्याचे म्हणत तिच्या लढाऊ वृत्तीला नेटीझन्सनी सलाम केला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियास्विगी