Join us  

समंथा प्रभूने स्वीकारलं चॅलेंज, विमानतळावरच केला डान्स; पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 1:16 PM

प्रसिद्ध अभिनेत्रीने विमानतळावरचा वेळ वाया न घालवता स्वत:ला आणि चाहत्यांना असं केलं खूश...

ठळक मुद्देसध्या ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असून नेहमी काही ना काही पोस्ट करत असते.  पांढरे शूज, काळी जीन्स आणि डेनिम जॅकेटमध्ये ती खूपच स्मार्ट दिसत आहे.

विमानतळावर जायचं म्हटलं की आपण थोडं लवकरच जातो. चेक इनला लागणारा वेळ, लगेजचे चेक इन या सगळ्या गोष्टी वेळेत व्हाव्यात म्हणून आपण थोडा जास्तीचा वेळ हातात ठेऊन विमानतळावर पोहोचतो. पण रात्री उशीराचे विमान असेल की मात्र याठिकाणी बसून राहायला कंटाळा येतो. विमानतळावर असे नुसते ताटकळत बसण्याची वेळ कदाचित प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिच्यावरही आली असावी. कारण नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये समंथा चक्क विमानतळावर डान्स करताना दिसत आहे. समंथाचे दक्षिण चित्रपटसृष्टीतच नाहीत तर देशभरात असंख्य चाहते आहेत. तिने पोस्ट केलेला हा डान्सचा व्हिडिओ काही वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

नुकताच समंथाचा ‘पुष्पा-द-राईज’ (Pushpa the rise) हा चित्रपट जोरदार गाजला असून यातील तिचे ऊ-अंटावा गाणेही जोरदार हिट झाले. हे गाणे गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे. या खास डान्ससाठी समंथाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये तिने अतिशय हटके डान्स करत आपल्या चाहत्यांना खूश केले आहे. पांढरे शूज, काळी जीन्स आणि डेनिम जॅकेटमध्ये ती खूपच स्मार्ट दिसत आहे. आपला डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर करताना ती लिहिते, "आणखी एक लेट नाईट फ्लाइट...नाही!! यासोबत तिने हलमिथी हबीबो असा हॅशटॅग लिहिला आहे. 

इंडस्ट्रीतील तिच्या अनेक मित्रांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. इतकेच नाही तर चाहत्यांनीही तिच्या या डान्सवर एकाहून एक कमेंटस केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, सो क्यूट, तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, समंथा यू रॉक्स, पूजा हेगडे तिच्या या डान्सने खूप प्रभावित झाली, तिने टाळ्या वाजवणाऱ्या इमोजीसह ‘अमेझींग’ असे म्हटले आहे. एकूण काय तर एअरपोर्टवर कंटाळा करत न बसण्यापेक्षा मधल्या कॉरीडॉरमध्ये असा डान्स करत समंथाने स्वत:ला आणि आपल्या चाहत्यांना खूश केले आहे. सध्या ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असून नेहमी काही ना काही पोस्ट करत असते.  समंथा आता साऊथ स्टार विजय देवरकोंडाच्या चित्रपटात एक खास डान्स करताना दिसणार आहे. त्याचबरोबर समांथाने हॉलिवूडचा एक प्रोजेक्टही साइन केला आहे. अरेंजमेंट ऑफ लव्ह असे या सिनेमाचे नाव आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामसमांथा अक्कीनेनी